November 17, 2025 10:00 AM

views 27

चीनच्या बॉम्बर विमानांची दक्षिण चीन समुद्रात टेहळणी

चीनच्या लष्करानं काल वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रात आपल्या लढाऊ विमानांसह पहिल्यांदाच बॉम्बर फॉर्मेशन टेहळणी केली. फिलिपिन्सच्या नौदलानं अमेरिका आणि जपानसोबत संयुक्त टेहळणी केल्यानंतर फिलिपिन्सला इशारा देण्यासाठी चीननं ही टेहळणी केली.   दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगणाऱ्या चीनचा फिलिपिन्स, ...

November 17, 2025 9:27 AM

views 50

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं मत

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन,  प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई य...

November 16, 2025 8:09 PM

views 30

दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव

दृष्टिहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा आठ खेळाडू राखून पराभव केला. स्पर्धेतला हा भारताचा सलग पाचवा विजय ठरला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं, मेहरिन अली हिच्या ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद १३५ धावा केल्या. भारतानं पाकिस्तान...

November 16, 2025 8:03 PM

views 24

मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी तसंच इतर जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक यासह धोरणात्मक विषयावर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाधमाध...

November 16, 2025 8:00 PM

views 36

माजी प्रधानमंत्री शेख हसीना आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात मानवी हक्काचं उल्लंघन झाल्या प्रकरणी दाखल झालेल्या दोन खटल्यांवर निर्णय जाहीर

बांगलादेशमधलं आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण उद्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांविरोधात मानवी हक्काचं उल्लंघन झाल्या प्रकरणी दाखल झालेल्या दोन खटल्यांवर निर्णय जाहीर करणार आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता, न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. बां...

November 16, 2025 7:54 PM

views 26

पाकिस्तानात, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या घटना दुरुस्ती विरोधात वकिलांचा संप

पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांवर गदा आणणाऱ्या २७व्या घटनादुरुस्तीविरोधात वकिलांनी संप पुकारला आहे. न्यायाधीशांनी देखील आपापल्या पदाचे राजीनामे देऊन निषेध नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आतापर्यंत पाकिस्तानचे सरन्यायाधीश सईद मन्सूर अली शाह यांच्यासह दोन न्यायाधीशांनी राजीनामा दिला आ...

November 16, 2025 7:55 PM

views 35

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या तिघांवर १५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्तापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत, तसंच एक रायफल, बीजीएल लॉन्चर्स, इतर शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं जप्त केली आहेत. तुमालपाड भागातल्या...

November 16, 2025 7:43 PM

views 34

पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवते – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

देशातल्या सकारात्मक घडामोडींनी युवा पिढीमध्ये आशावाद निर्माण केला असून, यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं  ‘मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार २०२४’ निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोच...

November 16, 2025 7:37 PM

views 26

१ जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पाकिस्तानमध्ये १ लाखापेक्षा जास्त अफगाण नागरिक बंदी

पाकिस्ताननं यंदाच्या १ जानेवारीपासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत १ लाखापेक्षा जास्त अफगाण नागरिकांना बंदी बनवल्याचं UNHCR, अर्थात संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या उच्चायुक्तालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.  बलुचिस्तानमध्ये चांगाई आणि क्वेट्टा, तर पंजाब प्रांतात सर्वाधिक संख्येनं अटक...

November 16, 2025 7:19 PM

views 33

भारताच्या धनुश श्रीकांतला एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक

  श्रवणदोष असलेल्यांसाठीच्या डेफलिंपिक्स २०२५ स्पर्धेत भारताच्या धनुश श्रीकांत यानं एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. जपानमध्ये टोक्यो इथं सुरू असलेल्या या स्पर्धेत त्यानं २५२ पूर्णांक २ दशांश गुण नोंदवत नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. भारताचाच मोहम्मद वनिया यानं २५० पूर्णांक १ दशांश गुण मिळव...