November 18, 2025 1:24 PM

views 92

आंध्रप्रदेशात सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत हिडमा सह सहानक्षली ठार

आंध्रप्रदेशात सुरक्षा दलांसोबत आज झालेल्या चकमकीत माओवादी कमांडर हिडमा मडावी याच्यासह सहा नक्षली मारले गेले. हिडमा याच्यावर एक कोटी रुपयांचं इनाम होतं. अनेक हिंसक कारवायांमधे हिडमाचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं.   ठार झालेल्यांमधे हिडमा मडावीची पत्नी राजे हिचाही समावेश आहे. आंध्र प्रदेशाम...

November 18, 2025 1:16 PM

views 31

सक्तवसुली संचालनालयाची दिल्लीत २५ ठिकाणी शोधमोहिमा

सक्तवसुली संचालनालयानं आज दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अल फलाह समूहाशी संबंधित २५ ठिकाणी शोधमोहिमा राबवल्या. आर्थिक अनियमितता, बनावट कंपन्यांचा वापर यासह इतर प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.   सध्या अल फलाह समूहाशी संबंधित असलेल्या आणि एकाच पत्त्यावर नोंद असलेल्या नऊ बनावट कंपन्यांचा तप...

November 18, 2025 1:03 PM

views 24

सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान ४५ भारतीयांचा बस अपघातात मृत्यू

सौदी अरेबियात मदिना जवळ बस आणि डिझेल टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून केवळ 1 जण बचावला आहे.   मृतांमध्ये 17 पुरुष, 18 महिला आणि 10 बालकं आहेत. प्रत्येक मृत भारतीय नागरिकाच्या  कुटुंबियाला 5 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं तेलंगणा सरकारनं जाहीर ...

November 18, 2025 10:02 AM

views 48

जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा गुरप्रित सिंग याला रौप्य पदक

इजिप्तमध्ये सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा ऑलिंपिकपटू गुरप्रित सिंग यानं पुरुषांच्या 25 मीटर पिस्तुल गटात रौप्य पदक पटकावलं. जागतिक स्पर्धेतलं गुरप्रितचं हे दुसरं रौप्यपदक आहे.   त्यानं 2008 मध्ये 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तुल गटात रौप्यपदक मिळवलं होतं. इजिप्तमधील जागतिक स्...

November 18, 2025 9:31 AM

views 34

भारताची विकसित देश होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती -प्रधानमंत्री

सध्या विविध क्षेत्रातील जागतिक अस्थिरतेच्या आणि आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत विकसित देश होण्याच्या आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे, अस प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल. नवी दिल्लीत काल आयोजित 6 व्या रामनाथ गोयंका व्याख्यानात ते बोलत होते.यावेळी प्रधानमंत्र्यांनी विव...

November 18, 2025 9:21 AM

views 26

बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथ होणार

बिहारमधील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पाटणा इथ होणार आहे. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 89 आमदार निवडून आले आहेत. या बैठकीत बिहारचे भाजप पर्यवेक्षकही सहभागी होतील अस बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी सांगितल.   संयुक्त जनता दल पक्...

November 18, 2025 9:14 AM

views 28

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आणखी एकाला अटक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएनं काल श्रीनगरमधून जसीर बिलाल वनी याला अटक केली. या बॉम्बस्फोटासाठी तांत्रिक मदत जसीर वनी यानं केल्याचा आरोप एनआयएनं केला आहे. त्यानं ड्रोन्स विकसित करून बॉम्बस्फोटापूर्वी त्या ठिकाणी मारा केला, असं तपास यंत्रणे...

November 17, 2025 8:46 PM

views 104

बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसिना यांना फाशीची शिक्षा, मायदेशात जायला हसिना यांचा नकार

बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधीकरणाने माजी प्रधानमंत्री शेख हसिना यांना आज फाशीची शिक्षा सुनावली. गेल्यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या हिंसाचाराबद्दल त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.   ऑगस्ट २०२४ मधे विद्यार्थी आंदोलकांना मारण्याच्या उद्देशाने बळाचा वापर करण्याचे आदेश हसिना यांनी दिले...

November 17, 2025 7:52 PM

views 476

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करण्यासाठी मुदतवाढ!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करण्यासाठी राज्य सरकारनं ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे आणि पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र कि...

November 17, 2025 7:43 PM

views 38

पालघरमध्ये काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती

पालघरमध्ये काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. २०२०मध्ये कोरोना काळात पालघर इथे झालेल्या साधुंच्या हत्येप्रकरणी काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. मात्र, आता त्यांनाच पक्षात प्रवेश दिल्यामुळे झालेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आला...