November 23, 2025 7:01 PM

views 75

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या डावात भारत अजुनही ४८० धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी आज दक्षिण आफ्रिकेनं आपल्या पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या अखेरच्या ४ गड्यांनी आज धावसंख्येत २५२ धावांची भर घात...

November 23, 2025 6:56 PM

views 60

महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारताचा संघ अंतिम फेरीत दाखल

महिलांच्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इराणला नमवून भारत अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आज झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने इराणचा ३३-२१ अशा गुणफरकाने पराभव केला. भारताकडून पूजा, संजू आणि सोनाली शिंगटे यांनी दिमाखदार चढाया करून गुण मिळवले तर साक्षी आणि रितू नेगी यांनी पकड करून इर...

November 23, 2025 6:51 PM

views 34

दृष्टीहीन महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला जेतेपद

भारतानं आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या दृष्टीहीन महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. भारतानं नेपाळचा ७ खेळाडू राखून पराभव केला आणि विश्वजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.   त्यानंतर भारतानं केवळ ३...

November 23, 2025 5:33 PM

views 21

जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात हमारा शौचालय, हमारा भविष्य विशेष मोहीम

केंद्रासह राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्हा परिषदेतर्फे २१ नोव्हेंबरपासून हमारा शौचालय, हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.   यात जिल्ह्यातील सर्व गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये दुरुस्ती करून वापरात आणण्यात येणार आहेत. येत्या दहा डिस...

November 23, 2025 2:55 PM

views 57

इफ्फी महोत्सवात ICFT UNESCO  गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार

गोव्यात पणजी इथं सुरू असलेल्या इफ्फी अर्थात ५६व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आजच्या चौथ्या दिवशी जगभरातील विविध चित्रपट तसंच कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.    दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इफ्फी महोत्सवात ICFT UNESCO  गांधी पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. अनुपम खेर या...

November 23, 2025 2:50 PM

views 15

ऑस्ट्रेलिया-कनडा- आणि भारत यांच्यात त्रिपक्षीय भागीदारीची घोषणा

भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांनी तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातली एक नवीन त्रिपक्षीय यंत्रणा अर्थात भागीदारी व्यवस्था घोषित केली आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बनीज आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या काल जोहान्सबर्ग इथे जी २० शिखर परिषदेच...

November 23, 2025 1:41 PM

views 19

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष याईर बोल्सनरो यांना अटक

ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष याईर बोल्सनरो यांना राजधानी ब्राझिलिया इथे पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली आहे. सध्याच्या सरकारविरोधात कारस्थान केल्याच्या आरोपावरून ४ ऑगस्टपासून गृहकैदेत असलेल्या बोलसनरो यांना फेडरल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अटक झाली असून २७ वर्ष ३ महिन्यांच्या  कैदेची...

November 23, 2025 1:17 PM

views 22

हवामान कराराच्या मसुद्यावर जागतिक नेत्यांचं एकमत

ब्राझीलमधल्या बेलेम इथे सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत अर्थात ‘कॉप ३०’ मध्ये अखेरीस हवामान कराराच्या मसुद्यावर सर्व जागतिक नेत्यांचं एकमत झालं आहे.   गेले दोन आठवडे सुरू असलेल्या या परिषदेच्या समाप्तीनंतरही काल रात्रभर लांबलेल्या चर्चेनंतर हा मसुदा तयार झाला असला तरीही त्यात...

November 23, 2025 11:48 AM

views 59

तेजस या लढाऊ विमान दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल यांना वीरमरण

दुबई एयर शोमध्ये तेजस या लढाऊ विमानाला झालेल्या दुर्घटनेत विंग कमांडर नमांश स्याल यांना वीरमरण आलं; त्यांचा पार्थिव देह काल भारतात आणण्यात आला.   तत्पूर्वी संयुक्त अरब अमीराती मधले भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि महावाणिज्य दूत सतीश सिवन यांनी विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली अर्पण केली....

November 23, 2025 11:06 AM

views 13

हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना

हज यात्रेशी संबंधित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्याक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत.   मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेकरूंच्या थकीत रकमेपैकी ७५ टक्के त्वरित आणि उर्वरित २५ टक्के निर्धारित पडताळणी प...