November 23, 2025 8:17 PM

views 31

इब्सा हा त्रिपक्षीय मंच तीन खंड, तीन मोठ्या लोकशाही आणि तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे- प्रधानमंत्री

 भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका अर्थात इब्सा हा त्रिपक्षीय मंच केवळ तीन देशांचा गट नसून तीन खंड, तीन मोठ्या लोकशाही आणि तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना जोडणारं व्यासपीठ आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. जोहान्सबर्ग इथं जी-२० शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या इब्साच्या बैठकीत त...

November 23, 2025 8:18 PM

views 64

तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित, जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं -प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘सर्वांसाठी समन्यायी भविष्य - अत्यावश्यक खनिजे, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सहभागी झाले आणि या सत्राला सं...

November 23, 2025 8:12 PM

views 193

सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आज सेवानिवृत्त होणार आहेत. आज संध्याकाळी गवई आपल्या पदावरून मुक्त होतील आणि त्यानंतर न्यायमुर्ती सुर्यकांत पदभार स्वीकारतील. न्यायमूर्ती सुर्यकांत उद्या देशाचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील. न्यायमूर्ती सुर्यकांत पुढचे १५ महिने देशाचे सरन्यायाधीश...

November 23, 2025 8:12 PM

views 21

माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार

माहे ही युद्धनौका उद्या मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्यापेक्षा जास्त सामग्री स्वदेशी बनावटीची आहे. मलबार किनारपट्टीवरच्या माहे या ऐतिहासिक गावावरून हिचं नाव ठेवण्यात आलं आ...

November 23, 2025 8:01 PM

views 21

भारतीय हवाई दल आपली तेजस ही लढाऊ विमानं बंद करणारअसल्याचा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

भारतीय हवाई दल आपली तेजस ही लढाऊ विमानं बंद करणार असल्याचा दावा खोटा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. तेजस विषयी समाज माध्यमावर प्रसारित होत असलेलं पत्र बनावट असल्याचं, पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने म्हटलं आहे. काही समाजमाध्यमावरच्या काही पाकिस्तानी प्रचार खात्यांकडून हे प...

November 23, 2025 7:47 PM

views 28

रशिया – युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेच्या मसुद्यावर जिनिव्हा इथे चर्चा

रशिया - युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने तयार केलेल्या शांतता योजनेच्या मसुद्यावर आज अमेरिका आणि युक्रेनचे उच्चाधिकारी तसंच फ्रांस, ब्रिटन आणि जर्मनीचे सुरक्षा सल्लागार जिनिव्हा इथे चर्चा करणार आहेत. अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यावेळी उपस्थित असती...

November 23, 2025 7:24 PM

views 47

नागपूरमध्ये आदिवासी गोवारी समाजानं पाळला शहीद दिन

नागपूरमध्ये आज आदिवासी गोवारी समाजानं शहीद दिन पाळला. २३ नोव्हेंबर १९९४ च्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन करत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या गोवारी या आदिवासी समाजातील ११४ जणांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं नागपूरमध्ये झिरो माइल इथल्या शहीद स्मारका...

November 23, 2025 7:21 PM

views 50

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या जोरदार प्रचार

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वसमत, भोकर नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. लोक काँग्रेसनं ७५ वर्षात काय दिले असा प्रश्न विचारतात काँग्रेसनं रोजगार, श...

November 23, 2025 7:15 PM

views 104

महाराष्ट्र मंत्रालयातले स्वीय सचिवअनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांची आत्महत्या

महाराष्ट्रातल्या मंत्रालयातले स्वीय सचिव अनंत गर्जे यांची पत्नी गौरी पालवे यांनी काल संध्याकाळी मुंबईतल्या आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. अनंत गर्जे हे पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. गौरी पालवे सरकारी रुग्णालय...

November 23, 2025 7:12 PM

views 21

हिंगोली जिल्ह्यात खटकाळी इथे रानभाजी आणि रानफळे महोत्सव

हिंगोली जिल्ह्यात खटकाळी इथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी आणि उगम ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला रानभाजी आणि रानफळे महोत्सव नुकताच पार पडला. आसपासच्या गावांतल्या शेतकऱ्यांनी जंगलातून गोळा केलेल्या विविध रानभाज्या आणि रानफळं या प्रदर्शनात मांडली होती. आदिवासी समाजा...