October 25, 2024 7:19 PM

views 23

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची चौथी यादी जाहीर

विधानसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यात कसबा पेठेतून गणेश भोकरे, चिखलीतून गणेश बरबडे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अभिजीत राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय केजमधून रमेश गालफाडे आणि कलीना इथून संदीप हुटगी निवडणुकीच्या रिंगणात असतील.

October 25, 2024 7:09 PM

views 35

राज्यात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल

राज्यात आज दुसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्ज भरायला उमेदवारांची गर्दी दिसून आली.    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्याआधी त्यांनी स...

October 25, 2024 7:15 PM

views 27

‘महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत, उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होणार’

महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नये, असं त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना बजावलं....

October 25, 2024 7:11 PM

views 25

मविआत प्रत्येकी ९० आणि उर्वरित जागा मित्रपक्षांना दिल्याचं बाळासाहेब थोरात यांचं स्पष्टीकरण

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार आहेत. उरलेल्या १८ जागा मित्र पक्षांना दिल्या जातील, अशी माहिती काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आज दिली.    राज्यात विधानसभा निवडणूक हरण्याच्या भीतीने भारतीय जनता पक्ष अफवा पसरवत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्...

October 25, 2024 5:24 PM

views 9

गेल्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं – सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड

गेल्या ७५ वर्षांत सर्वोच्च न्यायालयाचं रूप बदलून ते जनतेचं न्यायालय झालं आहे, असं प्रतिपादन विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं आहे. देशाचं सर्वोच्च न्यायालय लोकन्यायालय म्हणून काम करतं असं...

October 25, 2024 5:19 PM

views 23

राज्यात आचारसंहितेच्या काळात कारवाईत ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्यात आचारसंहितेच्या काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत कालपर्यंत एकूण ९० कोटी ७४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.  आज पुण्यातून १३८ कोटी रुपयांचं सोनं जप्त केल्याचं वृत्त आहे.    कालच्या एका दिवसात ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहि...

October 25, 2024 5:17 PM

views 19

काँग्रेस पक्षाची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेस पक्षानं ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदार संघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली इथून नाना पटोले, ब्रह्मपुरी - विजय वडेट्टीवार, तिवसा - यशोमती ठाकूर, संगमनेर - बाळासाहेब थोरात तर पलूस इथून विश्वजीत कदम यांना    उमेदवारी देण्यात आली आहे. लातू...

October 25, 2024 5:12 PM

views 19

‘दाना’ चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवर धडकलं

दाना चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीवरील केंद्रपाडा, भद्रक आणि बालासोर इथं धडकल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. त्यामुळे किनारपट्टीवरील भितर कनिका राष्ट्रीय उद्यान आणि धामरा दरम्यान जोरदार वारे आणि पाऊस झाला. या भागात मोठ्या प्रमाणात झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले असून अनेक घरं आणि भातपिकांच...

October 25, 2024 4:54 PM

views 42

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याची घोषणा केली. यात अणुशक्तीनगर इथून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळ मधून संजय पाटील, वडग...

October 25, 2024 3:25 PM

views 14

वंचित वर्गाच्या सेवेला प्राधान्य देण्याचं राष्ट्रपती मुर्मू यांचं आवाहन

वंचित वर्गाच्या सेवेला प्राधान्य देण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. रायपूर इथल्या अखिल भारतीय वैद्यकीय संस्थेच्या दुसऱ्या दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराची गरजही त्यांनी व्यक्त केली.