October 26, 2024 10:12 AM

views 7

परभणी येथे अवयव दानाची पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

परभणी इथं काल अवयव दानाची पहिली प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. जिंतूर इथल्या १८ वर्षीय सार्थक नवले याला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषीत केल्यावर, त्याच्या आई वडिलांनी त्याचे अंतर्गत अवयव गरजू रुग्णांना दान करण्याचा निर्णय घेतला, काल सकाळी वैद्यकीय पथकं सार्थकचे अवयव घेऊन रवाना झाले. एक मूत्रपिंड नांदे...

October 26, 2024 10:08 AM

views 47

नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

नांदेडचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांनीही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, राष...

October 26, 2024 10:02 AM

views 32

विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत ९९१ उमेदवारांचे १ हजार २९२ अर्ज दाखल झाले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय शिरसाट यांनी तसंच औरंगा...

October 26, 2024 9:54 AM

views 7

महाविकास आघाडीतले तीनही प्रमुख पक्ष प्रत्येकी ९० जागा लढवणार

महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ही माहिती दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नयेत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, पं...

October 25, 2024 8:03 PM

views 18

दाना चक्रीवादळामुळं ओडिशात जीवितहानी नाही, हजारो हेक्टरवरच्या भात पिकांचं नुकसान

दाना-चक्रीवादळाचा फटका बसलेल्या  ओडिशातल्या  केंद्रपारा, भद्रक, बालासोर आणि जगतसिंगपूर जिल्ह्यांमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. या चक्रीवादळामुळे मानवी जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. या भागातल्या  हजारो हेक्टर भातशेतीच्या  पिकांचे नुकसान झाले आहे. या चक्...

October 25, 2024 7:59 PM

views 8

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळेच शांतता, समृद्धी आणि सुरक्षितता नांदत आहे – लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिंद्र कुमार

लष्कर आणि इतर यंत्रणांनी जम्मू-काश्मीरमध्ये सातत्यानं आणि झोकून देऊन केलेल्या प्रयत्नांमुळेच या भागात शांतता, समृद्धी आणि सुरक्षितता नांदत आहे, असं प्रतिपादन लष्कराच्या उत्तर विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एम. व्ही. सुचिंद्र कुमार यांनी केलं आहे. काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल ...

October 25, 2024 7:55 PM

views 20

हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू

हरियाणा विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं. हंगामी अध्यक्ष डॉ. रघुबीर सिंग यांनी नव्या सदस्यांना आमदारकीची शपक्ष दिली. त्यानंतर हरविंदर कल्याण यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून तसंच क्रिशन लाल मिढ्ढा यांची उपाध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झाली.

October 25, 2024 7:53 PM

views 26

वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे राज्य सरकारांना विशेष तयारी ठेवण्याचे आदेश

देशातल्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना विशेष तयारी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य सेवेचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागांना वायू प्रदूषणाच्या तयारीबाबत पत्र लिहिलं आहे. या पत्रात वायू प्रदूषणाचा श्वसनक्रिया, हृदय तसं...

October 25, 2024 8:07 PM

views 32

भारत आणि जर्मनी दरम्यान विविध क्षेत्रात सामंजस्य करार

भारत आणि जर्मनीने आज ग्रीन हायड्रोजन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण याबाबतह...

October 25, 2024 8:09 PM

views 18

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडकडे ३०१ धावांची आघाडी

कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावात न्यूझिलंडने आज दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात १९८ धावा केल्या. यासह न्यूझिलंडने सामन्यात ३०१ धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदरने चार तर आर. अश्विन याने एक गडी बाद केला.    त्याआधी भारताचा पहिला डाव १५६ धावांवर आटोपला. न्यूझीलंड...