October 29, 2024 1:43 PM

views 25

इस्रायलचा संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ५३ कोटी ७० लाख डॉलर्सचा करार

इस्रायलने राफेल प्रगत संरक्षण प्रणाली आणि एल्बिट सिस्टीम नावाच्या दोन इस्रायली संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ५३ कोटी ७० लाख डॉलर्सचा करार केला आहे. इस्रायलची लेझर संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करणं हा या करारामागचा उद्देश आहे. या करारांतर्गत आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन नावाच्या प्रणालीचं उत्पादन वाढवण्...

October 29, 2024 6:58 PM

views 24

अखेरच्या दिवशीही उमेदवार याद्या जाहीर

भारतीय जनता पक्षानं आज जाहीर केलेल्या यादीनुसार उमरेडमधून सुधीर पारवे, तर मीरा भाईंदरमधून नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षानं माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजित पाटील, मुलुंडमधून संगीता वाजे, मोर्शी मधून गिरीश कराळे, पंढरपूरमधून अनिल सावंत, मोहोळमधून राज...

October 29, 2024 1:23 PM

views 36

देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह; प्रधानमंत्र्यांच्या देशवासियांना शुभेच्छा

देशभरात आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी साजरी होत आहे. आजच्या दिवशी धनाची आणि धानाची तसंच देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरींची पूजा आज केली जाते. धणे आणि गूळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान धन्वंतरींच्या कृपेमु...

October 29, 2024 1:16 PM

views 15

वस्त्रोद्योग क्षेत्रात बदल केल्यास हे क्षेत्र आघाडीवर राहील – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

कृषी क्षेत्रानंतर वस्त्रोद्योग हे सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारं क्षेत्र असून वस्त्रोद्योग क्षेत्रात आधुनिकीकरण आणि कालानुरुप बदल केले तर भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्र आघाडीवर राहील, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत कॉटन टेक्सटाइल ...

October 29, 2024 1:04 PM

views 39

धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात घट

देशांतर्गत सराफा बाजारात आज धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा ५०० रुपयांची घट झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ८० हजारांवरून घसरून ७९ हजार ७९० रुपये झाली आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७३ हजार १४० रुपये झाला आहे. चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नसून चांदीचा दर ९७ हजार ९०० रुप...

October 29, 2024 1:27 PM

views 33

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५१ हजार पेक्षा जास्त युवकांना नियुक्तीपत्राचं वाटप

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्ती मिळालेल्या  ५१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्ती पत्रांचं वितरण केलं. तरुणांना कायमस्वरुपी नोकऱ्या देण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी यावेळी...

October 29, 2024 12:38 PM

views 37

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत एकता दौडचं आयोजन

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आज एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी ३१ ऑक्टोबरला आयोजित केली जाणारी ही एकता दौड यावर्षी दिवाळीमुळे दोन दिवस आधीच म्हणजे आज घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या एकता दौडीला हिरवा झेंडा दाखवला. एकता दौड ...

October 29, 2024 1:34 PM

views 42

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ८ ते १५नोव्हेंबर या कालावधीत चार टी-20 सामने खेळणार आहे. विद्यमान राष्ट्रीय...

October 29, 2024 11:15 AM

views 25

प्रधानमंत्री १२ हजार कोटींहून अधिक खर्चाच्या आरोग्यविषयक योजनांचा प्रारंभ करणार

प्रधानमंत्री नेरंद्र मोदी आज धन्वंतरी दिन आणि नवव्या आयुर्वेद दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आरोग्याशी संबंधित जवळपास १२ हजार ८५० कोटी रुपयांच्या योजनांचा प्रारंभ करणार आहेत. ७० वर्षं आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान प्रधानमंत्री भारत जन आरोग्य योजनेत सामावून घेण्याच्या योजनेचीही ते ...

October 29, 2024 10:55 AM

views 21

आशियाई महिला हॉकी स्पर्धेसाठी १८ खेळाडूंचा संघ जाहीर

आगामी ‘आशियाई महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा २०२४’ साठी १८ खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी सलीमा टेटे संघाचं नेतृत्व करणार असून, नवनीत कौर उपकर्णधार आहे. बिहार मधील राजगीर हॉकी मैदानावर येत्या ११ ते २० नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेतील सामने खेळले जाणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या...