October 30, 2024 5:15 PM

views 124

मविआमध्ये कोणतेही वाद नसून मैत्रिपूर्ण लढत होणार नाही – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताही वाद राहिला नसून. कोणत्याही मतदार संघात मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ज्या मतदारसंघात मित्रपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत ते दोन दिवसात चर्चा...

October 30, 2024 3:07 PM

views 27

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर कालपर्यंत आलेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. १५ ते २९ ऑक्टोबरपर्यंत सी-व्हिजिल ॲपवर एकूण १ हजार ६४८ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातल्या १ हजार ६४६ तक्रारी निकाली काढल्याची माहिती मुख्य निवडणू...

October 30, 2024 6:45 PM

views 20

भारताचा परकीय चलन साठा ६८८ अब्ज २७ कोटी अमेरिकी डॉलर्सवर

भारतीय रिझर्व बँकेनं काल एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या कालावधीसाठी परकीय चलन साठा व्यवस्थापनाबाबतचा  ४३ वा अर्धवार्षिक अहवाल प्रकाशित केला. १८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत भारताकडे एकूण ६८८ अब्ज २७ कोटी अमेरिकी डॉलर्स इतका परकीय चलन साठा असल्याचं या अहवालात  म्हटलं आहे.  भारतीय रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी २००४ म...

October 30, 2024 12:12 PM

views 14

राज्यभरात २८८ मतदार संघांसाठी ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ अर्ज दाखल

महाराष्ट्रातल्या २८८ विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीसाठी विविध पक्षांच्या आणि अपक्ष अशा ७ हजार ९९५ उमेदवारांनी दहा हजार ९०५ अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी आज होणार असून चार नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येतील. काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, शेवटच्या दिवशीही अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर...

October 29, 2024 8:08 PM

views 40

भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज महिला क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हीनं एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत, इंग्लंडच्या सोफी हीला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दीप्तीची ही कारकिर्दीतली सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमव...

October 29, 2024 8:07 PM

views 14

भारतीय नौदलाचा नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवाद कार्यक्रम स्वावलंबन २०२४

संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाला चालना देऊन संरक्षण  सामुग्रीची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न  असल्याचा पुनरुच्चार सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. भारतीय नौदलाच्या नवोन्मेष आणि स्वदेशीकरण परिसंवाद, स्वावलंबन २०२४ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. संरक्षण क्षेत्रात खासगी आणि सार्वजनिक अशा दोन्...

October 29, 2024 7:55 PM

views 33

भारताचे लोहपुरुष सरदार पटेल यांची १५० वी जयंती श्रीलंकेत साजरी

भारताचे लोहपुरुष आणि आणि भारताच्या एकतेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे म्हणून ओळखले जाणारे सरदार पटेल यांची १५० वी जयंती श्रीलंकेत कोलंबो इथंही साजरी केली गेली. यानिमित्तानं कोलंबोतल्या लिओनेल वेंडट आर्ट सेंटर इथं सरदार वल्लभभाई पटेल यांचे जीवन आणि वारसा सांगणारं छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आ...

October 29, 2024 7:52 PM

views 19

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून नईम कासीमच्या नावाची घोषणा

हिजबुल्लाहचा नवा प्रमुख म्हणून या संघटनेच्या संस्थापक सदस्य असलेल्या नईम कासीम च्या नावाची घोषणा हिजबुल्लाहनं केली आहे. ७१ वर्षांचा कासीम या संघटनेत १०९१ पासून उपसरचिटणीस म्हणून काम करत आहे. महिन्याभरापूर्वी इस्रायलनं केलेल्या बॉम्बहल्ल्यात मारला गेलेल्या हसन नसरल्लाह ची जागा आता कासीम घेईल.  १९९७ म...

October 29, 2024 7:43 PM

views 25

जम्मू-काश्मीरमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३० जण जखमी

जम्मू-काश्मीरमधे उधमपूर जिल्ह्यात एक खासगी प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३० जण जखमी झाले. जखमींमध्ये परिचारिका महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचं स्थानिक पोलिसांनी कळवलं आहे. ही बस सलमारीहून उधमपूरला जात असताना, फरमा गावाजवळ रस्तावरून घसरून दरीत कोसळली. या घटनेबद्दल...

October 29, 2024 7:41 PM

राजस्थानमधे झालेल्या अपघातात १२ जण ठार तर २५ पेक्षा जास्त जण जखमी

राजस्थानमधे सीकर जिल्ह्यात एका खाजगी प्रवासी बसला झालेल्या अपघातात १२ जण ठार तर २५ पेक्षा जास्त जण जखमी झाले. ही बस सालासर इथून नवलगडकडे जात होती. आज दुपारी बस लक्ष्मणगड इथून जात असताना च्या वेळी बसचालकाचे वाहनावरचं नियंत्रण सुटलं आणि ती पुलावर आदळली. अपघातातल्या काही जखमीना जयपूर इथं तर, काहींना सी...