November 2, 2024 9:43 AM

views 4

चार वर्षानंतर पूर्व लडाखच्या डेमचोकमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत चीन सैन्याची गस्त सुरू

  पूर्व लडाख भागातील वास्तविक नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैन्यानं गस्त सुरू केली आहे. भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेमचोक परिसरात एप्रिल 2020 मध्ये उभय सैन्यात संघर्ष झाल्यानंतर सुमारे साडेचार वर्षांपासून थांबवण्यात आलेली गस्त पुन्हा सुरू करण्यात आली आहे. डेपसांगमधील गस्त ल...

November 1, 2024 3:20 PM

views 29

राज्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या ४७ हजाराच्या वर

  राज्यात येत्या २० तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल. यामध्ये १८ ते १९ वयोगटातले एकूण २२ लाख २२ हजार ७०४, तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले ४७ हजार ३९२ मतदार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली.   राज्यातल्य...

November 1, 2024 3:23 PM

views 5

रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू

रेल्वे तिकीट आरक्षणाचे नवीन नियम आजपासून लागू झाले आहेत. रेल्वेनं याआधी असलेल्या १२० दिवसांच्या आरक्षण कालावधीत कपात करून तो ६० दिवसांवर आणला आहे. मात्र, ३१ ऑक्टोबरपर्यंत झालेली आरक्षणं कायम राहतील अशी माहिती रेल्वेनं दिली आहे.   ६० दिवसांच्या आरक्षण कालावधीमुळे तिकिटांच्या उपलब्धतेच्या शक्यता ...

November 1, 2024 3:28 PM

views 9

आज लक्ष्मीपूजना दिवशी शेअर बाजारात होणार मुहूर्ताचे सौदे

दीपावलीच्या प्रकाश पर्वानिमित्त देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. घरोघरी आकाश कंदील, पणत्या, विजेच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई, रांगोळ्या, या बरोबरीनं आप्तजनांच्या भेटीगाठी, फराळाच्या पदार्थांची मेजवानी असं चैतन्याचं वातावरण आहे.   आज संध्याकाळी लक्ष्मी पूजन होणार असून त्यासाठी झेंडूच्या फु...

November 1, 2024 2:38 PM

views 37

झारखंडमध्ये दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यासाठी 634 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.   झारखंडमध्ये, पहिल्या टप्प्याचं मतदान येत्या १३ नोव्हेंबरला तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान, 20 नोव्हेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४३ मतदारस...

November 1, 2024 2:34 PM

views 20

केंद्र सरकारकडून नमो ड्रोन दीदी या योजनेसाठी कार्यान्वय विषयक मार्गदर्शक तत्वे जारी

  नमो ड्रोन दीदी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्रसरकारने मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केंद्र सरकारच्या पातळीवर कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग तसंच ग्रामविकास आणि खतं विभागाच्या सचिवांच्या समिती या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.   या योजनेअंतर्गत महिला बचत गटांन...

November 1, 2024 2:27 PM

views 33

भारत आणि इंडोनेशिया लष्कराच्या गरुड शक्ती या सरावाचं नववं सत्र यंदा इंडोनेशियात

भारत आणि इंडोनेशिया लष्कराच्या गरुड शक्ती या सरावाचं नववं सत्र यंदा इंडोनेशियात जकार्ता इथं होत आहे. हे सत्र येत्या १२ नोव्हेंबर पर्यंत सुरु राहील. या संयुक्त सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची २५ जवानांची तुकडी आज जकार्ताला रवाना झाली. या तुकडीचं प्रतिनिधित्व पॅराशूट रेजिमेंट करत आहे. दोन्ही ...

November 1, 2024 2:18 PM

views 5

लक्ष्मीपूजना निमित्त शेअर बाजारात आज सुट्टी

मुंबईत राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात आज लक्ष्मीपूजना निमित्त सुट्टी आहे. मात्र व्यापाऱ्यांचं नव वर्ष विक्रम संवत २०८१ च्या प्रारंभानिमित्त आज मुहूर्ताचे सौदे होतील. आज संध्याकाळी पावणे सहा ते सहा या दरम्यान आरंभपूर्व तर संध्याकाळी सहा ते सात या वेळेत मुहूर्ताची सत्र होतील.

November 1, 2024 2:08 PM

views 47

जगभरातील अनेक देशांमध्येही दिवाळीचा सण उत्साहात साजरा

जगभरात अनेक देशांमधे दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत आहे. अमेरिका, इंग्लंडसह संयुक्त अरब अमिरातीमध्येही दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून या भारतीय उत्सवाने देशभरातल्या सर्व समुदायांना सामावून घेतल्याचं चित्र दिसत आहे.   स्थानिकरित्या 'मिनी इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बर-दुबईमध्ये द...

November 1, 2024 2:05 PM

views 33

आय पी एल साठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या २०२५ हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधारपद दिलं होतं.   याआधीही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलेल्या हार्दिकनं मधल्या काळ...