November 3, 2024 7:59 PM

views 24

देशातलं क्षयरोगाचं कमी झालेलं प्रमाण, हे समर्पण भावनेनं केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचं फलित आहे – प्रधानमंत्री

देशातलं क्षयरोगाचं कमी झालेलं प्रमाण, हे समर्पण भावनेनं केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयत्नांचं फलित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतात २०१५ ते २०२३ या कालावधीत क्षयरोगाचं प्रमाण १७ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांनं घसरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटलं आहे. आरोग्यमंत्री जे....

November 3, 2024 7:08 PM

views 28

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

भाजपाचे ९९ टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू असा इशारा त्यांनी दिली.

November 3, 2024 7:04 PM

views 20

राज्यभरात, उमेदवारी अर्ज भरलेल्या रिपाई कार्यकर्त्यांनी अर्ज मागं घेऊन महायुतीचा प्रचार करण्याचं रिपब्लिकन पक्षाचं आवाहन

राज्यभरात, रिपब्लिकन पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत; त्यांनी आपले अर्ज मागं घ्यावेत, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केलं आहे. जागावाटपात रिपब्लिकन पक्षावर अन्याय झाला असून त्यामुळे नाराजी पसरली आहे हे खरं असलं तरी महायुतीचं सरकार आल्या...

November 3, 2024 6:36 PM

views 41

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आकाशवाणीच्या कार्यालयाबाहेर स्फोट

जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आकाशवाणीच्या कार्यालयाबाहेर रविवारच्या बाजारात झालेल्या ग्रेनेडच्या स्फोटात किमान १० नागरिक जखमी झाले. हाती आलेल्या माहितीनुसार टीआरसी क्रॉसिंग भागात दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या वाहनांच्या दिशेनं एक ग्रेनेड फेकला, मात्र त्यांचा नेम चुकल्यानं तो रस्त्यावर फुटला. पोलिस...

November 3, 2024 6:33 PM

views 26

मनोज जरांगे पाटील यांचीआंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत बैठक

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आज आंतरवाली सराटी इथं सहकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या निवडणुकीत कोणत्या जागा लढवायच्या याबाबत या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. ज्या जागा जिंकून येणं शक्य आहे तिथंच उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी आपल्याला त्रास दे...

November 3, 2024 6:24 PM

views 33

पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक

सरकारनं आज सांगितलं की पंजाबमधल्या मंडईत ९० लाख टन तांदळाची आवक झाली आहे. यापैकी पंच्याऐंशी लाख टनांहून अधिक खरेदी पंजाबमधल्या राज्य संस्था आणि भारतीय अन्न महामंडळानं केली.  सरकारनं ठरविल्यानुसार ग्रेड ‘अ’ तांदळासाठीमधल्या घनिष्ठ भागीदारीचा आढावा घेण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध आणखी वाढवण्याच्या मार...

November 3, 2024 7:13 PM

views 41

वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली

केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली. प्रियांका गांधी कोरोम आणि थरिओडे इथंही प्रचारसभा घेणार आहेत. तर राहुल गांधी अरीकोड इथं प्रचारसभा घेणार आहेत.   एलडीएफचे उमेदवार सत्यन मोकेर...

November 3, 2024 4:12 PM

views 40

आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं निधन

गडचिरोली जि्ल्ह्यातल्या आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिराम वरखडे यांचं काल रात्री नागपुरात एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. आज दुपारी आरमोरी तालुक्यातल्या जोगीसाखरा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.   हरिराम वरखडे ह...

November 3, 2024 4:09 PM

views 18

केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत – नाना पटोले

राज्यातल्या कापूस शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून हमीभावानं कापूस खरेदी करण्याचे निर्देश भारतीय कापूस महामंडळाला द्यावेत द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. कापूस उत्पादनात म...