November 4, 2024 7:50 PM

views 28

राज्यात मविआ १८० जागा जिंकेल, बाळासाहेब थोरातांचा विश्वास

राज्यात महाविकास आघाडी १८० जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयांचा महाविकास आघाडीला फायदा होईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

November 4, 2024 7:18 PM

views 21

मविआत जागावाटपाबद्दल शेतकरी कामगार पक्षाशी चर्चा झाली – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीत जागावाटपाबद्दल शेतकरी कामगार पक्षाशी चर्चा झाली असून उरणची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढवेल, तर अलिबाग, पेण आणि पनवेलमधून शेकापचे उमेदवार निवडणुकीत उतरतील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

November 4, 2024 7:13 PM

views 31

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजेंची माघार

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अखेरच्या क्षणी अर्ज मागं घेतला. काँग्रेसनं राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करुन मधुरिमा राजे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे लाटकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर  गेल्या काही दिवसांपासून माघारी...

November 4, 2024 8:06 PM

views 22

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली

राज्यात २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी चित्र आज स्पष्ट झालं. यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात सुमारे ४ हजार १०० उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सुमारे ३ हजार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असले तरी बंडखोरी पूर्णपणे शमलेली नाही. गेल्या विधानसभा न...

November 4, 2024 6:58 PM

views 23

दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला मुदतवाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक अणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरायला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार सहा ते १९ नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर २० ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येईल. राज्य मंडळाचे सचिव देविदास कु...

November 4, 2024 7:39 PM

views 26

महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारीनंतर आयोगानं ही कारवाई केली आहे. पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे सोपवला आहे. नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी त...

November 4, 2024 7:51 PM

views 23

परिवर्तन महाशक्ती आघाडीची १२१ उमेदवारांची यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीनं १२१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.    छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी, वामनराव चटप, धनंजय जाधव यांच्यासह अनेक समविचारी नेत्यांची नागपूर इथं बैठक झाली. या बैठकीत ही यादी जाहीर करण्यात आली. कसलाही वाद न होता जागावाटप पूर्ण झालं असल्याचं...

November 4, 2024 8:17 PM

views 23

उत्तराखंडमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू, १९ जखमी

उत्तराखंडमधल्या अल्मोडा जिल्ह्यात आज एक बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३६ जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले आहेत. या बसमध्ये ५५ प्रवासी होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघाताविषयी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री साहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख...

November 4, 2024 7:51 PM

views 20

मनोज जरांगे यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी पाठवली नसल्यामुळे माघार घेत असल्याचं, त्यांनी आज सकाळी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं बातमीदारांना सांगितलं. मर...

November 4, 2024 3:34 PM

views 28

…तर पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू – आशिष शेलार

रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यावरून नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीसांवर बेछूट आरोप केले. मात्र, त्याचे पुरावे नसतील तर आज नाना पटोले यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, अशी माहिती भाजपाचे आमदार आणि मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली.