November 8, 2024 7:25 PM

views 22

महाराष्ट्राच्या विकासाला महायुती सरकारच चालना देऊ शकेल – प्रधानमंत्री

विधानसभा निवडणुकांसाठीच्या  प्रचाराने वेग घेतला आहे.  भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात जाहीर सभा घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याचं काम केवळ महायुतीचं सरकारच करु शकतं असं त्यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरण, युवकांना रोजगार, आदिवासींचे हक्क इत्यादी क्षेत्रात...

November 8, 2024 6:58 PM

views 23

प्रधानमंत्री, गृहमंत्री जाती-धर्माच्या नावानं मतं मागत असल्याची पटोलेंची टीका

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांना पराभव दिसत आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जाती आणि धर्माच्या नावानं मतं मागत असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत केली.    छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीत जाती धर्माच्या नावाव...

November 8, 2024 6:53 PM

views 27

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे – शरद पवार

राज्यात आणि देशात महिला सुरक्षित नसून भ्रष्टाचार वाढला आहे, देशात सध्या मोदी यांची हुकूमशाही सुरू आहे अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. ते आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं प्रचारसभेत बोलत होते. महविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांना दरमहा तीन हजार रुपये, बसचा मोफत प्रवास, जातनिहाय जनगणना करून ५०...

November 8, 2024 7:40 PM

views 14

महायुती सत्तेत आल्यावर पहिल्या १०० दिवसांचं व्हिजन मांडत काम करणार – मुख्यमंत्री

राज्यात महायुतीचं सरकार आल्यावर पहिल्या शंभर दिवसांचं व्हिजन मांडत त्यानुसार काम करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धारशिव इथल्या प्रचार सभेत सांगितलं. महायुतीचे धाराशिवचे उमेदवार अजित पिंगळे आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या प्रचार सभेत ते बोलत हो...

November 8, 2024 7:26 PM

views 12

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी गृहमतदानाला सुरुवात

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज गृहमतदान होत आहे. निवडणूक अधिकारी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन बॅलेट पेपरद्वारे मतदानाची प्रक्रिया राबवत आहेत. गृहमतदानासाठी रिसोड मतदारसंघात ५४६, वाशिम मतदारसंघात ४३२ तर कारंजा मतदारसंघात ४७९ मतदारांनी नोंद केली आहे.    सोलापूर जिल्ह्यातही...

November 8, 2024 8:33 PM

views 14

मविआनं बंद केलेल्या योजना पुन्हा सुरु केल्या जातील – गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्या दोन प्रचारसभा आज राज्यात झाल्या. केंद्रात पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार २००४ ते २०१४ या कालावधीत दहा वर्षे सत्तेत असतानाच्या काळात महाराष्ट्राला केवळ १ लाख ९१ हजार कोटी रूपये निधी मिळाला तर, मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात १० लाख १५ हजार ८९० कोटी...

November 8, 2024 7:40 PM

views 23

किसान सन्मान निधीची रक्कम १५ हजार करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आश्वासन

महायुती सत्तेवर आल्यास किसान सन्मान निधीची रक्कम १२ हजारावरुन १५ हजार करण्याचं आश्वासन मोदी यांनी नाशिक शहरात पंचवटी इथल्या प्रचारसभेत दिलं. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडें यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आदरांजली वाहिली. जनहितासाठी उज्ज्वला योजना, जलजीवन मिशन, नळाद्वारे घराघरात पिण्या...

November 8, 2024 3:32 PM

views 9

कर्मयोगी सप्ताहअंतर्गत सहभागींनी ३८ लाख तासांहून अधिक तास अभ्यास केला – सरकार

कर्मयोगी सप्ताह या राष्ट्रीय शिक्षण सप्ताह उपक्रमा अंतर्गत सहभागींनी ३८ लाख तासांहून अधिक तास अभ्यास केल्याचं सरकारने सांगितलं आहे. १९ ते २७ ऑक्टोबर या काळात चार लाख तीन हजार जणांनी किमान चार तास अभ्यास केला. या उपक्रमात ४५ लाख अभ्यासक्रमाची नोंद करण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे.

November 8, 2024 3:26 PM

views 20

मुंबईच्या वडाळा इथून १ कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे चेंडू जप्त

मुंबईच्या वडाळा इथून पोलिसांनी काल एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे चेंडू जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी एका इलेक्ट्रिशियनला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाळा परिसरात एका व्यक्तीच्या हालचाली संशायस्पद वाटल्यानं त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकश...

November 8, 2024 2:50 PM

views 25

एकत्रिपणे मविआच्या पाठीमागे उभं राहा, जयंत पाटलांचं आवाहन

एकनाथ शिंदेंच्या सरकारने महाराष्ट्र अधोगतीकडे नेला आहे. त्यामुळे राज्याला पुन्हा प्रगतीच्या मार्गावर न्यायचं असेल, तर आपण एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे,' असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये क...