November 26, 2025 3:37 PM

views 34

सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु

सैयद मुश्ताक अली टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु झाली. या स्पर्धेत ३८ संघ सहभागी होत आहेत. उद्घाटनाचा सामना मिझोराम आणि नागालँड यांच्यात पुण्याच्या डेक्कन जिमखाना मैदानावर होत आहे. स्पर्धेतला अंतिम सामना १८ डिसेंबरला इंदूरमध्ये होईल. गतविजेत्या मुंबई संघाचं कर्णधारपद यावेळी शार्दूल ठाकूरकडे ...

November 26, 2025 3:31 PM

views 27

फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ५ डिसेंबरपासून

फिफा विश्वचषक फूटबॉल स्पर्धेची प्राथमिक फेरी येत्या ५ डिसेंबरपासून वॉशिंग्टन इथं सुरू होणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी स्टेडियम आणि किक-ऑफ सह सामन्यांचं वेळापत्रक जाहीर होईल. पुढच्या वर्षी ११ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचं संयुक्त यजमानपद अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा या तीन देशांकडे आहे. स्पर्धेच...

November 26, 2025 3:33 PM

views 52

दिल्ली स्फोट प्रकरणातल्या सातव्या आरोपीला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणातील आरोपी उमर उन नबी याला आश्रय देणाऱ्या फरीदाबादमधल्या एका रहिवाशाला राष्ट्रीय तपास संस्थेनं आज अटक केली. त्याचं नाव सोयब असून या प्रकरणात अटक झालेला तो सातवा आरोपी असल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेने सांगितलं. सोयब उमर उन नबी याला रसद पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या प्रकरणा...

November 26, 2025 8:04 PM

views 68

दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना आणि मालिका भारतानं गमावली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आणि ही मालिकांही भारतानं २-० अशी गमावली. आज पाचव्या दिवशी २ बाद २७ वरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा १४० धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ तर दुसऱ्या डावात २६० धावा केल्या होत्या. भारताचा संघ पहिल्या डावात ...

November 26, 2025 3:10 PM

views 27

संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू

संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे नोव्हेंबर महिन्यासाठीचे अध्यक्ष मायकल इमरान कानू, यांच्याबरोबर एका संयुक्त पत्रावर स्वाक्षरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभे...

November 26, 2025 3:18 PM

views 30

राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांचं वितरण होणार

केंद्रीय पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांचं वितरण होणार आहे. राष्ट्रीय दूध दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पशुधन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू केले जातील. दूध आणि दु...

November 26, 2025 12:23 PM

views 33

युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला सुरुवात

रशियाच्या नेतृत्वातील युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला आज औपचारिक सुरुवात होणार आहे. केंद्रिय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल ही माहिती दिली. रशियासह अर्मेनिया, बेलारुस, कझाकस्तान आणि किर्गिझस्तान या देशांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या 20 ऑगस्ट रोजी ...

November 26, 2025 11:51 AM

views 23

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त पदयात्रेचं आयोजन

केंद्रिय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावर पदयात्रा आयोजित केली आहे. सरदार पटेलांचं मूळ गांव असलेल्या करमसाड गावातून आज या पदयात्रेचा प्रारंभ होणार असून ६ डिसेंबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सांगता होणार आहे. स्वच्छता, स्वद...

November 26, 2025 12:51 PM

views 157

संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे. "हमारा संविधान - हमारा स्वाभिमान" ही यंदाची संकल्पना आहे. नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, लोकसभेचे सभापती ओम बिरला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यसभेतले सभाग...

November 26, 2025 1:00 PM

views 47

सॅफरान विमान इंजिन देखभाल दुरुस्ती सुविधेचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं S A E S I अर्थात सफ्रान एअरक्राफ्ट इंजिन सर्विसेस इंडिया सुविधेचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केलं. भारत हा जगातील सर्वात वेगाने वाढणारी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ असणारा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. भारताने नेहमीच गुंतवणूक ...