November 26, 2025 7:58 PM

views 48

अहमदाबादमध्ये १००वी राष्ट्रकुल स्पर्धा २०३० मध्ये होणार

१००वी राष्ट्रकुल स्पर्धा २०३० मध्ये गुजरातच्या अहमदाबाद इथं होणार आहेत. राष्ट्रकुल संघटनेनं आज ग्लासगो इथं औपचारिकरीत्या आयोजनाचे अधिकार भारताकडे सोपवले. यात ७४ देशातले खेळाडू सहभागी होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयोजनाची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. जगभरातल्या खेळाडूंचं स्वागत ...

November 26, 2025 7:53 PM

views 34

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्हला फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद

उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर जावोखीर सिंदारोव्ह यानं फिडे विश्वचषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अवघ्या १९व्या वर्षी ही कामगिरी करणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे. गोव्यातल्या अरपोरा इथं झालेल्या या स्पर्धेत त्यानं चीनचा ग्रँडमास्टर वेई यी याला हरवलं. सिंदारोव्ह, वेई यी आणि रशियाचा आंद्...

November 26, 2025 7:50 PM

views 20

शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीची पडताळणी सुरू – केंद्र सरकार

बांग्लादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीची पडताळणी सुरू असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. बांग्लादेशाच्या नागरिकांच्या हितासाठी कटीबद्ध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत म्हणाले.    अरुणाचल प्रदेश हा भारताच...

November 26, 2025 7:25 PM

views 29

मुंबईची हवा ‘खराब’ श्रेणीत

मुंबईत आज संध्याकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२४ इतका नोंदवण्यात आला. हा आकडा अतिशय खराब या श्रेणीत मोडतो. इथियोपियातल्या ज्वालामुखीचा उद्रेक हे यामागचं कारण असू शकतं, शिवाय, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात गुणवत्ता निर्देशांक सामान्यतः घसरलेला असतो.    गेल्या २४ तासात राज्यातल्या का...

November 26, 2025 7:13 PM

views 150

महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करायला मुदतवाढ

राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं, तसंच अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता २७ नोव्हेंबर ऐवजी ३ डिसेंबर झाली आहे, हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम ...

November 26, 2025 7:13 PM

views 58

ST कडून शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची घोषणा!

शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना एसटी बस संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही  समस्या असेल तर एसटीनं त्यांच्यासाठी  हेल्पलाईन सुरू केली आहे. १८००- २२१- २५१ या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.    विद्यार्थ...

November 26, 2025 7:13 PM

views 113

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता ८ फेब्रुवारी ऐवजी  २२ फेब्रुुवारी २०२६ ला घेण्यात येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षी अर्थात सीटीईटी...

November 26, 2025 7:12 PM

views 34

IITच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईतल्या आयआयटीच्या नावातून बॉम्बेचं काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली.    केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आयआय...

November 26, 2025 7:17 PM

views 44

पुण्यातल्या २ मेट्रो मार्गिका आणि बदलापूर – कर्जत दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिकांना मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वेमार्गालाही मंजुरी दिली.   पुण्यातल्या ४ आणि ४ ए या नव्या मार्गिंकांसाठी एकूण ९ हजार ८५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित...

November 26, 2025 3:46 PM

views 41

इफ्फीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत आज द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्नेस्टो मार्टिनेझ बुसिओ यांनी केलं असून त्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. या चित्रपटाने यंदाच्या बर्लि...