November 10, 2024 2:01 PM

views 21

कॅनडात हिंदू मंदिराच्या परिसरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी आणखी एकाला अटक

कॅनडात अलिकडेच ब्रॅम्प्टन इथं हिंदू मंदिराच्या परिसरात झालेल्या हिंसाचारा प्रकरणी तिथल्या पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. कॅनडाच्या प्रशासनानं या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केलं आहे.

November 10, 2024 5:02 PM

views 21

भाजपाचं संकल्पपत्र अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध

भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान, आणि गरीबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते. लाडकी बहीण योजनेअ...

November 10, 2024 5:02 PM

views 19

मविआचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मुंबईत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले. या महाराष्ट्रनाम्यात शेती आण...

November 10, 2024 5:03 PM

views 27

ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ सारंगीवादक पंडित रामनारायण यांच्या पार्थिवावर काल मुंबईत शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईत शुक्रवारी रात्री त्यांच वांद्रे इथल्या त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९७ वर्षांचे होते. सारंगीला हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात एकल वाद्य म्हणून नावारुपाला आणण्यात त्या...

November 10, 2024 11:05 AM

views 26

मतदान जनजागृतीसाठी परभणीत मॅरेथॉनचं तसेच सायकल रॅलीचं आयोजन

स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

November 10, 2024 11:02 AM

views 216

मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम

नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध...

November 10, 2024 10:50 AM

views 12

सत्ताधारी आणि विरोधकांची आश्वासनांच्या खैरातीसह एकमेकांवर कडाडून टीका

काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमरावती इथल्या प्रचारसभेत सांगितलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू, असं आश्वासन खर्गे यांनी दिलं. महाविकास आघाडी सरकार...

November 10, 2024 10:40 AM

views 31

आज सर्वत्र हवामान कोरडं राहील, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात काल सर्वात कमी किमान तापमान नाशिक इथं 14 पूर्णांक 7 दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. आज सर्वत्र हवामान कोरडं राहील आणि किमान तापमान सरासरीच्या आसपास असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.  

November 10, 2024 10:25 AM

views 23

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सात भारतीय संस्थांना सर्वोच्च शंभरमध्ये स्थान

भारतातल्या सात संस्थांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग्ज आशिया 2025 मध्ये सर्वोच्च शंभरात स्थान मिळवलं आहे. दिल्लीतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आयआयटीसह भारतातली दोन विद्यापीठे पहिल्या पन्नासमध्ये तर सात विद्यापीठे सर्वोच्च शंभरात आली आहेत. संपूर्ण खंडामध्ये उच्चशिक्षणात भारताच्या उत्त...

November 10, 2024 11:06 AM

views 35

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ दहाच दिवस उरले असल्यानं राजकीय पक्षांच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. प्रचारसभा, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, विविध संस्थांसोबतच्या बैठका याद्वारे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.