November 11, 2024 8:34 PM

views 17

महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून मलेशियाचा ४-० असा पराभव

बिहार इथं सुरू असलेल्या महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने मलेशियाचा ४-० असा पराभव केला. भारताच्या संगीता कुमारीच्या शेवटच्या गोलने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यातला उद्घाटनपर सामना २-२ असा अनिर्णित राहिला.  या स्पर्धेत भारतासह जपान दक्षिण कोरिया...

November 11, 2024 8:31 PM

views 11

श्रीलंकेत १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक

श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार आज मध्यरात्री संपणार आहे. १९६ जागांसाठी ८ हजार ८०० हून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रधानमंत्री हरिणी अमारसुरिया, माजी प्रधानमंत्री दिनेश गुनवर्धने, विरोधी पक्षातले साजिथ प्रेमदास हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.  गुरुवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेदरम...

November 11, 2024 8:29 PM

views 23

डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचं वृत्त रशियानं फेटाळलं

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरुन चर्चा झाल्याचं वृत्त रशियानं फेटाळलं आहे. ट्रम्प निवडणुुकीत विजयी झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्याचं वृत्त खोटं आणि काल्पनिक असल्याचं रशियाच्या अध्यक्षांचे प्रवक्ते...

November 11, 2024 8:23 PM

views 9

कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही – सर्वोच्च न्यायालय

आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे, असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज यांच्या द्विसदस्यीय पीठाने आज झालेल्या सुन...

November 11, 2024 8:17 PM

views 35

११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार संपला

११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज संध्याकाळी प्रचार संपला. राजस्थानात ७, पश्चिम बंगालमधे ६, आसाममधे ५, बिहारमधे ४, कर्नाटकात ३ आणि मध्य प्रदेश-सिक्कीममधे प्रत्येकी २ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केरळ, छत्तीसगड, गुजरात, मेघालय ...

November 11, 2024 8:15 PM

views 23

झारखंड विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघातला प्रचार संपला

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आज सायंकाळी संपला. या टप्प्यातील ४३ जागांसाठी बुधवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात प्रचारादरम्यान दोनशेहून अधिक सभा घेण्यात आल्याचं वृत्त आमच्या वार्ताहरानं दिलं आहे. एनडीएनं बांगलादेशी घुसखोरी, हेमंत सोरेन सरकारविरोधातील भ्रष्टाचार, बेरोजगा...

November 11, 2024 7:42 PM

views 27

आचारसंहिता लागू झाल्यापासून ४९३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी नि...

November 11, 2024 7:29 PM

views 24

राज्यात मतदान जनजागृती कार्यक्रमाला सुरूवात

केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राज्यातील १४ जिल्ह्यात आजपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रमाला आज सुरुवात झाली. अह...

November 11, 2024 7:23 PM

views 22

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची प्रकाश आंबेडकर यांची टीका

काँग्रेस आणि भाजपा नागरिकांची फसवणूक करत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज वाशिम इथल्या प्रचारसभेत केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधानाच्या रंगावरून वाद घालून लोकांना भ्रमित करू नये, असंही आंबेडकर म्हणाले.

November 11, 2024 7:14 PM

views 29

जीएसटीच्या माध्यमातून वसूल केलेले पैसे लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले – जयंत पाटील

महायुती सरकारच्या काळात जीएसटीच्या माध्यमातून जनतेकडून पैसे वसूल करून तेच लाडकी बहीण योजनेद्वारे वाटले गेले, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरच्चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. ते आज पुणे जिल्ह्यातल्या पर्वती मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर मह...