November 12, 2024 2:25 PM

views 23

अवैधरीत्या सोनं आणणाऱ्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागानं केली अटक

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर अवैधरीत्या सोनं आणणाऱ्या प्रवाशाला सीमाशुल्क विभागानं काल अटक केली. दुबईतून आलेल्या या प्रवाशाकडून ३ सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली. तीन किलोग्रॅम वजनाच्या या सोन्याची किंमत दोन कोटी २७ लाख इतकी आहे. कपड्यांच्या खिशात लपवून त्यानं हे सोनं आ...

November 12, 2024 2:20 PM

views 24

युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिक संरक्षण धोरण महत्वाचं असल्याचं संरक्षणमंत्र्यांचं प्रतिपादन

सुरक्षा व्यवस्थेला उद्भवणारा धोका आणि युद्धाच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी लवचिक संरक्षण धोरण महत्वाचं असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं दिल्ली संरक्षण संवादात बोलत होते. लवचिक संरक्षण धोरण ही केवळ धोरणात्मक निवड नाही तर आत्यंतिक गरज आहे, असंही ते म्हणाले. भ...

November 12, 2024 2:18 PM

views 36

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी नि...

November 12, 2024 3:30 PM

views 5

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची आजची सभा रद्द

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली मतदारसंघातली आजची नियोजित सभा रद्द झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आपण चिखलीला येऊ शकलो नाही, असं राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला हमीभाव मिळत ...

November 12, 2024 2:03 PM

views 9

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज प्रधानमंत्र्यांसह अनेक बड्या नेत्यांच्या ठिकठिकाणी सभा

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर ज्येष्ठ नेते राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. भाजप...

November 12, 2024 1:56 PM

views 21

सार्वजनिक प्रसारण दिन आज होतोय साजरा

सार्वजनिक प्रसारण दिन आज साजरा होत आहे. फाळणीच्या वेळी हरियाणात कुरुक्षेत्र इथं आसरा घेतलेल्या निर्वासितांना आधार देणारं भाषण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी आकाशवाणी दिल्लीच्या स्टुडियोमधून केलं होतं. त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा होतो. आकाशवाणी दिल्लीच्या सभागृहात आज य...

November 12, 2024 11:41 AM

views 18

राज्यात विधानसभा निवडणुकीचा दिवस जवळ येत असल्याने, सर्वच उमेदवारांनी वाढवला प्रचाराचा वेग

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत; त्यामुळे विविध राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.जाहीर सभा, प्रचार फेऱ्या, प्रचार करणाऱ्या वाहनांच्या फेऱ्या आणि उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठीची लगबग वाढली आहे.   प्रधानम...

November 12, 2024 11:16 AM

views 19

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राज्यात विविध उपक्रमांचं आयोजन

नांदेड विधानसभा मतदार संघातल्या गावामध्येही एलईडी व्हॅनद्वारे मतदार जनजागृती करण्यात येणार असून, या व्हॅनचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, केंद्रीय संचार ब्युरोचे सुमीत डोडल उपस्थित होते. जिल्ह्यात मागील निवडणुकीमध्य...

November 12, 2024 11:09 AM

views 22

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात मतदार जनजागृती अभियान सुरु

केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातल्या १४ जिल्ह्यात कालपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ रवान...

November 12, 2024 11:05 AM

views 8

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं मुख्य शासकीय महापूजा

कार्तिकी एकादशी आज साजरी होत आहे. पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते करण्यात आली. दरवर्षी शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येते, मात्र यंदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने ही महापूजा प्रशासकीय ...