November 15, 2024 8:19 PM

views 21

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशपर्यंत विद्युतप्रवाह सुरू

भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशापर्यंत विद्युतप्रवाह आज सुरू झाला. बांगलादेशाच्या ऊर्जा मंत्रालयाचे सल्लागार मोहम्मद फौजुल कबीर खान आणि नेपाळचे ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्यासमवेत केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांनी पहिल्या 40 मेगावॅटपर्यंतच्या विद्युतप्रवाहाचं उद्घाटन केलं. त्यामुळे भारत, न...

November 15, 2024 8:15 PM

views 25

रशियानं युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात १ ठार, ८ जखमी

रशियानं युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्यात एक जण ठार झाला आणि इतर आठ जण जखमी झाले. रशियाची २१ ड्रोन्स पाडल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे. तर युक्रेनच्या वोझनेसेंका गावावर ताबा मिळवल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.

November 15, 2024 8:12 PM

views 28

इफ्फी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार दिला जाणार

जगभरातल्या नवोदित चित्रपटकर्मींच्या असामान्य योगदानाची दखल घेण्यासाठी ५५ व्या इफ्फी या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात पदार्पणातल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. १० लाख रूपये रोख, चांदीचा मोर आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या श्रेणीसाठी पाच आंतरराष्ट्रीय...

November 15, 2024 8:07 PM

views 12

प्रधानमंत्री उद्या राज्यातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमोऍपच्या माध्यमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या भारतीय जनता पक्षाच्या माझा बूथ सर्वात मजबूत या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातल्या १ लाख बूथ प्रमुखांशी नमो ऍपच्या माध्यमातून, तसंच दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधतील. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

November 15, 2024 7:59 PM

views 18

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण

बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीचं औचित्य साधून, नवी दिल्लीत बानसेरा पार्क इथं उभारलेल्या बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचं अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. या निमित्तानं सराई कालेखान चौकाचं नामांतर भगवान बिरसा मुंडा चौक करायचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं अमित शहा यांनी यावेळी सांगितलं...

November 15, 2024 7:33 PM

views 103

कणकवली बसस्थानकात दोन एसटी बसमध्ये चिरडल्याने एका महिलेचा मृत्यू

सिंधुदुर्गमध्ये कणकवली बसस्थानकात दोन एसटी बस मध्ये चिरडल्याने एका ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळं काहीवेळा नागरिकांनी बस वाहतूक रोखून धरली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वतःकडून मृताच्या नातेवाईकांना ५ लाखाची मदत दिली. या प्रकरणी दोन्ही बसच्या चालक आणि वाहकांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचं न...

November 15, 2024 7:31 PM

views 17

विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृतीला जोर

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर संदेश प्रकाशित झाले आहेत. २७ लाख बँक ग्राहकांना मतदान करण्याचं आवाहन एसएमएसद्वारे...

November 15, 2024 7:20 PM

views 30

विरोधक महाराष्ट्रला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची जे. पी. नड्डा यांची टीका

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने उत्तम काम केलं असून विरोधक महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. ठाण्यात आज झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा सबका साथ, सबका विकास करताना देशातल्या गरीब घटकाची प्रगती करणा...

November 15, 2024 7:14 PM

views 24

भाजपा ‘दोन धर्मात तेढ निर्माण करत असल्याचा असदुद्दीन ओवैसी यांचा आरोप

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मताधिकाराला ‘व्होट जिहाद’ म्हणत दोन धर्मात तेढ निर्माण करत असून हे अयोग्य असल्याचा आरोप एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेत ते बोलत होते.

November 15, 2024 7:05 PM

views 22

काँग्रेसची NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर भूमिका नाही, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

गेल्या पाच वर्षामध्ये NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षाने भूमिका घेतली, असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले.