November 17, 2024 1:22 PM

views 18

स्वीप उपक्रमाअंतर्गत पालघर मध्ये आज रन फॉर वोट चं आयोजन

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी स्वीप उपक्रमा अंतर्गत पालघर मध्ये आज रन फॉर वोट चं आयोजन करण्यात आलं होत.    या ३ कि.मी आणि ५ कि.मी मॅरेथॉन मध्ये पालघर शहर, वसई-विरार महानगरपालिका...

November 17, 2024 3:08 PM

views 23

देशाच्या पहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारताच्या दूर पल्ल्याच्या पहिल्यावहिल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची काल उड्डाण चाचणी घेतली. ओदिशातल्या ए पी जे अब्दुल कलाम बेटावरुन या क्षेपणास्त्राने यशस्वी उड्डाण केलं. सशस्त्र दलांसाठी पंधराशे किलोमीटरपेक्षा दूर पल्ल्याचं विविध पेलोड घेऊन जाण्याची क्षमता या क्षेप...

November 17, 2024 1:36 PM

views 24

इस्रायली सैन्य लेबनॉनची हद्द ओलांडून ५ किलोमीटर अंतर्भागात/ इस्राएल वरच्या ५ ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी इराकमधल्या इस्लामिक रेझिस्टन्स, शिया पंथी गटानं स्वीकारली

इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्स, या शिया मिलिशिया गटानं आज दक्षिण आणि उत्तर इस्रायलमध्ये करण्यात आलेल्या पाच ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दक्षिण इस्रायलमधील इलात बंदरातील चार महत्त्वाची ठिकाणे आणि लष्करी छावण्या आणि उत्तर इस्रायलमधील एक लष्करी छावणीला लक्ष्य करण्यात आलं असल्याचं या गटांन प्...

November 17, 2024 2:25 PM

views 6

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची ईफ्फी 2024 साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून क...

November 17, 2024 11:52 AM

views 19

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज जपान बरोबर होणार

महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज जपान बरोबर होणार आहे. भारतीय महिला खेळाडूंनी आशयाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये विजयाची घोडदौड सुरू ठेवत चीन ला 3-0 नं हरवून सलग चौथ्यान्दा विजय प्राप्त केला आहे. जपाननं मलेशिया ला 2-1 असं हरवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपला पहिला व...

November 17, 2024 11:44 AM

views 43

COP29 दरम्यान “ग्लोबल एनर्जी एफिशिएन्सी अलायन्स” स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात

संयुक्त अरब अमिरातीनं अझरबैजानमध्ये आयोजित COP29 दरम्यान “ग्लोबल एनर्जी एफिशिएन्सी अलायन्स” स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सुरुवात केली आहे. 2030 पर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमता दर दुप्पट करणे आणि उत्सर्जनात लक्षणीय घट होण्यास हातभार लावणे हे या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. हा उपक्रम COP28 म...

November 17, 2024 11:36 AM

views 30

डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऊर्जा विभागाच्या प्रमुखपदी ख्रिस राईट यांची निवड जाहीर केली आहे. राईट हे लिबर्टी एनर्जी या जीवाश्म इंधनाच्या पुरस्कर्त्या संस्थेचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ट्रम्प यांच्या तेल आणि वायूचं उत्पादन वाढवण्याच्या उद्दिष्टांशी त्या...

November 17, 2024 11:11 AM

views 7

एक पेड माँ के नाम या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्याला गती देणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

एक पेड माँ के नाम या उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्याला गती देणाऱ्या सर्वांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. जास्तीत जास्त लोकानी त्यांच्या आईच्या सन्मानार्थ एक झाड लावावं आणि शाश्वत ग्रहासाठी योगदान द्यावं असं आवाहन एका समाज माध्यमावरील संदेशात मोदींनी केलं आहे.

November 17, 2024 11:03 AM

views 65

नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील हवेची गुणवत्ता अजूनही गंभीर श्रेणीत

हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग आणि संबंधित अधिकार्‍यानी हवेची गुणवत्ता निकृष्ट असलेल्या नवी दिल्लीतील राष्ट्रीय राजधानी प्रदेशातील विभागांसाठी श्रेणी निर्धारित कृती आराखडा तयार केला आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या बैठकीमध्ये यासंबंधी काही कडक निर्णय घेण्यात आले. येत्या आठवडाभरात नागरिकांकडून आलेल्या ...

November 17, 2024 10:50 AM

views 27

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद अंतिम स्पर्धेत ओडिशाची हरियाणावर मात

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ओडिशाच्या शिलानंद लाक्रा यानं हॅट्ट्रिक साधत काल चेन्नई इथं झालेल्या अंतिम स्पर्धेत हरियाणाचा 5-1 असा पराभव करूंन ओडिशाला विजय मिळवून दिला. शिलानंदने तीन गोल केले, तर रजत आकाश तिर्की यानं सुरुवातीला मिळालेल्या संधीचं सोनं करून ओडिशाला आघाडी मिळवून दिली....