November 14, 2024 3:57 PM November 14, 2024 3:57 PM

views 55

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचं आज सकाळी नाशिक इथे त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. पेठ-सुरगाणा या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उतरलेले चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आधी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते खासदार झाले. भारतीय जन...

November 14, 2024 3:52 PM November 14, 2024 3:52 PM

views 2

चलनवाढीचा दर ऑक्टोबर महिन्यात २.३६ टक्के

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर ऑक्टोबर महिन्यात २ पूर्णांक ३६ शतांश टक्के झाला आहे. सप्टेंबर महिन्यात हा दर १ पूर्णांक ८४ होता टक्के होता. खाद्यपदार्थ, कांदे, बटाट्याच्या किंमती वाढल्यानं चलनवाढीचा दर वाढला.

November 14, 2024 8:16 PM November 14, 2024 8:16 PM

views 15

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र ...

November 14, 2024 3:44 PM November 14, 2024 3:44 PM

views 103

आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधासभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. बांगर यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्याने केला आहे.  याच भागातल्या वाकोडी गावात काल मविआचे उमेदवाराच्या प्रचारासाठी ...

November 14, 2024 8:14 PM November 14, 2024 8:14 PM

views 13

राज्यात गृहमतदानाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांमधले ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३ हजार ५८३ मतदार आणि ५९२ दिव्यांग मतदारांसाठी आजपासून गृहमतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कुवारबाव इथे राहणाऱ्या ९२ वर्षं वयाच्या मतदार जयश्री नाईक यांनी गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन ...

November 14, 2024 6:59 PM November 14, 2024 6:59 PM

views 17

विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक – मंत्री नितीन गडकरी

ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते.    देशातली गरीबी, बेरोजगारी दूर व्हायला हवी, स्मार्ट शहरांप्रमाणेच स्मार्ट खेडी उभारली गेली...

November 14, 2024 3:04 PM November 14, 2024 3:04 PM

views 10

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला दोन कांस्य पदकं

पंजाबमधल्या अमृतसर इथल्या गुरुनानक देव विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दोन कांस्य पदकं पटकावली आहेत. ६८ किलो वजनी गटात सय्यद उमर आणि ८७ किलो वजनी गटात राज घुले या दोघांनी कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. विजयी खेळाडूंसह प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक य...

November 14, 2024 2:59 PM November 14, 2024 2:59 PM

views 3

हॉकी : महिला आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा सामना थायलंड संघाशी होणार

बिहारमध्ये सुरू असलेल्या महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत आज यजमान भारताचा सामना थायलंडच्या संघाशी होणार आहे. राजगीर इथे संध्याकाळी पावणे पाच वाजता हा सामना सुरू होईल. यापूर्वीच्या दोन सामन्यां भारताच्या संघाने मलेशिया आणि दक्षिण कोरियाचा पराभव केला होता. या स्पर्धेत आज दुपारी अडीच वाजता जपानचा ...

November 14, 2024 8:14 PM November 14, 2024 8:14 PM

views 15

लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर टाच

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका आरोपीच्या स्थावर मालमत्तेवर टांच आणली आहे. गेल्या फेब्रुवारीत श्रीनगर इथं दोन पर्यटकांची हत्या झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या आरोपीची श्रीनगरमधली मालमत्ता जप्त करण्यात आली असून तो सध्या श्रीनगरच्या मध्यवर्त...

November 14, 2024 4:33 PM November 14, 2024 4:33 PM

views 4

माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांना मुंबई NIAच्या विशेष न्यायालयाकडून वारंट जारी

माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकुर यांना मुंबई NIA च्या विशेष न्यायालयाने वारंट जारी केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या अंतिम सुनावणीला प्रज्ञा ठाकुर गैरहजर राहिल्या, त्यामुळे हे वारंट जारी करण्यात आलं आहे. प्रज्ञा सिंह यांना जारी केलेलं गेल्या आठ दिवसातलं हे दुसरं वारंट आहे.