November 24, 2024 6:54 PM

views 26

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा शरद पवार यांचा निर्धार

पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहू, नव्या पिढीला उभं करणं हा आपला कार्यक्रम राहील, असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते आज सातारा जिल्ह्यात कराड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.   महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, आपल्याकडून ...

November 24, 2024 6:47 PM

views 5

भारत मंडपम इथं आंतराष्ट्रीय सहकार संघटनेच्या, जागतिक सहकार परिषदेचं उदघाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतराष्ट्रीय सहकार संघटनेच्या, जागतिक सहकार परिषदेचं उदघाटन होणार आहे. सहकारातून सर्वांची समृद्धी ही या सहा दिवसीय परिषदेची संकल्पना आहे. संघटनेच्या १३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच या परिषदेचं आयोजन भारतात केलं जात आहे. या क...

November 24, 2024 6:36 PM

views 15

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची इंडिया आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांची इंडिया आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आज झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांची भेट घेतली आणि राज्यपालांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं. तत्पूर्वी सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. नव्या सरकारचा शपथविधी २८ न...

November 24, 2024 6:19 PM

views 11

अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू  सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

अनाहत सिंग हीनं १० व्या जेएसडब्ल्यू  सुनील वर्मा स्मृती स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. तिनं अंतिम फेरीत शमीना रियाझचा हीचा ११-४, ११-३, ११-१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. अनाहत हीचं मागच्या तीन महिन्यांमधलं हे पाचवं विजेतेपद आहे.

November 24, 2024 6:09 PM

views 20

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं, प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री म्हणाले. याच उद्देशानं देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली आहे, असं त्यांनी...

November 25, 2024 6:42 PM

views 20

राज्यात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विधिमंडळ पक्षांच्या नेत्यांची निवड झाली आहे. शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्...

November 24, 2024 6:04 PM

views 18

इफ्फी चित्रपट महोत्सवात युवक फार मोठ्या संख्येनं सहभागी

गोव्यात होत असलेल्या ५५ व्या ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात युवक फार मोठ्या संख्येनं सहभागी होता आहेत. ‘युवा चित्रपट निर्माता- भविष्‍य आताच आहे’ अशी या वर्षीच्या इफ्फीची संकल्पना  आहे. ‘उद्याची सर्जनशील मनं’ आणि ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक’ अशा उपक्रमांतर्गत स्पर्धा घेण्यासोबतच या मह...

November 24, 2024 7:59 PM

views 19

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू

संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार प...

November 24, 2024 3:49 PM

views 23

अखिल भारतीय एससी-एसटी रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन

अखिल भारतीय एससी-एसटी अर्थात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्यावतीने नागपूरच्या अजनी रेल्वे ग्राउंड इथं उद्या २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन केलं आहे. उद्या सकाळी साडे आठ वाजता केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्त...

November 24, 2024 7:59 PM

views 21

कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर विजयासाठी ५३४ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात ३ बाद १२ धावा झाल्या आहेत.   आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात कालच्या बिनबाद १७२ या धावसंख...