November 25, 2024 7:18 PM

views 17

प्रसारभारती, रेलटेल, प्लेबॉक्सटीव्ही एकत्रितपणे रेलवायर ब्रॉडबॅन्ड ही स्वतंत्र योजना तयार

प्रसारभारती, रेलटेल आणि प्लेबॉक्सटीव्ही यांनी एकत्रितपणे रेलवायर ब्रॉडबॅन्ड ही स्वतंत्र योजना तयार केली आहे. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव दि्ववेदी आणि रेलटेलचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक संजय कुमार यांनी या योजनेचं आज नवी दिल्लीत उद्घाटन केलं. रेलवायर या रेलटेल कंपनीच्या किरकोळ इ...

November 25, 2024 7:16 PM

views 4

अकोला आणि कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून २१ व्या पशुगणनेला सुरुवात

अकोला आणि कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून २१ व्या पशुगणनेला सुरुवात झाली. ही गणना २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत केली जाणार आहे. अकोला जिल्ह्यात पशुसंवर्धन खात्याचे १३८ तर  कोल्हापूर जिल्ह्यात  प्रगणक ग्रामीण भागात घरोघरी जाऊन पशुंची गणना करणार आहेत. प्रगणकांकडून गाय, म्हैस, शेळी, मेंढी, वराह, उंट, घोडा, गाढ...

November 25, 2024 7:15 PM

views 20

गोव्यात सुरु असलेल्या ईफ्फी चित्रपट महोत्सवात प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार

गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आज प्रादेशिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. प्रादेशिक चित्रपटांमध्ये संस्कृतीचं दर्शन होत असल्याचं केरेबेटे या कन्नड चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेते गौरीशंकर एसआरजी यांनी म्हटलं आहे. महोत्सवात आज सुमारे ७५ चित्रपट दाखवले जाणार आहेत. यावेळी ऑस्...

November 25, 2024 7:06 PM

views 15

भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल, असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. नवी दिल्ली इथे भारत मंडपम इथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सहकार क्षेत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे, असं ते म्हणाले. भारतात सहकारी संस्था...

November 25, 2024 8:03 PM

views 28

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अदानी प्रकरणावरुन गदारोळ

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज सुरु झालं. पहिल्याच दिवशी अदानी उद्योग समूहाच्या कथित लाचखोरी प्रकरणावरून गदारोळ झाल्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    लोकसभेत सुरुवातीला वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण आणि इतर दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहून कामकाज काही काळ तह...

November 25, 2024 7:00 PM

views 24

१४ राज्यांमधील  २२७ लिंगभाव संसाधन केंद्राचं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन

नयी चेतना 3.0 मोहिमेअंतर्गत १४ राज्यांमधील  २२७ लिंगभाव संसाधन केंद्राचं आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत उद्घाटन केलं. ही मोहिम २३ डिसेंबरपर्यंत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालणार आहे. एक साथ, एक आवाज, हिंसा के खिलाफ असं या मोहिमेचं घोषवाक्य आहे. &n...

November 25, 2024 8:01 PM

views 310

देशाच्या संविधानाचा अमृतमहोत्सव यंदा साजरा करण्यात येणार

देशाच्या संविधानाचा अमृतमहोत्सव यंदा साजरा करण्यात येणार आहे. उद्यापासून २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वर्षभर त्याअंतर्गत विविध कार्यक्रम होतील. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना या बाबतची माहिती दिली. दिल्लीतल्या संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात एक भव्य कार्यक्रम ...

November 25, 2024 7:50 PM

views 25

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासंदर्भात अद्याप निर्णयाची प्रतीक्षा

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत विविध पातळ्यांवर चर्चा सुरु आहे. महायुतीतल्या शिवसेनेच्या गटनेतेपदी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी अजित पवार यांची निवड कालच झाली. मात्र भाजपा विधिमंडळ पक्षाची नेतानिवड अद्याप बाकी आहे. त...

November 25, 2024 6:52 PM

views 15

सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करण्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं आवाहन

संविधान सभेतल्या वादविवादापासून प्रेरणा घेत सभागृहाच्या सदस्यांनी संसदेच्या शिष्टाचाराचं पालन करावं, असं आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलं. संविधान हे प्रत्येक नागरिकाचं असून त्यावर देशातल्या सर्व नागरिकांचा विश्वास असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

November 25, 2024 7:09 PM

views 31

भारताची बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेत विजयी सलामी

बॉर्डर- गावस्कर करंडक कसोटी मालिकेतल्या पहिल्या क्रिकेट सामन्यात आज भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १- शून्यने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात पर्थ इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान संघाला २९५ धावांनी धूळ चारली. हा विजय भारताचा सगळ्यात मोठ्या कसोटी...