November 17, 2024 10:50 AM November 17, 2024 10:50 AM

views 11

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद अंतिम स्पर्धेत ओडिशाची हरियाणावर मात

राष्ट्रीय वरिष्ठ पुरुष हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ओडिशाच्या शिलानंद लाक्रा यानं हॅट्ट्रिक साधत काल चेन्नई इथं झालेल्या अंतिम स्पर्धेत हरियाणाचा 5-1 असा पराभव करूंन ओडिशाला विजय मिळवून दिला. शिलानंदने तीन गोल केले, तर रजत आकाश तिर्की यानं सुरुवातीला मिळालेल्या संधीचं सोनं करून ओडिशाला आघाडी मिळवून दिली....

November 17, 2024 10:45 AM November 17, 2024 10:45 AM

views 11

चीन मधील शाळेत झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार

चीन मधील शाळेत झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार तर 17 जण जखमी चीन मधील जिआंगसू प्रांतातील एका शाळेत काल झालेल्या चाकू हल्ल्यात 8 जण ठार तर 17 जण जखमी झाले. जू या 21 वर्षीय संशयिताला घटनास्थळी पकडण्यात आलं असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानं प्रमाणपत्र न मिळाल्या...

November 17, 2024 10:42 AM November 17, 2024 10:42 AM

views 12

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मध्य रेल्वेकडून जादा रेल्वे गाड्यांची सोय

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकिदरम्यान मध्ये रेल्वे कडून 19 आणि 20 तारखेला जादा रेल्वे गाड्यांची सोय केली जाणार असल्याचं मध्य रेल्वेनं एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते कल्याण आणि पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत. 20 नोव्हेंबर ला होत असलेल्या मतदा...

November 17, 2024 10:36 AM November 17, 2024 10:36 AM

views 27

‘मिशन झिरो डेथ’ द्वारे केलेल्या प्रयत्नांमुळे रेल्वे रुळांवरील मृत्यूदरात घट

‘मिशन झिरो डेथ’चा एक भाग म्हणून रेल्वे रुळांवरील मृत्यू कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं केलेल्या अथक प्रयत्नांमुळे, अत्यंत प्रभावी परिणाम दिसत आहेत. मध्य रेल्वेनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार जानेवारी ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत रेल्वे रुळावरील मृत्युंची संख्या 14 टक्क्यांनी घटली आहे तर जखमी झाल...

November 17, 2024 9:35 AM November 17, 2024 9:35 AM

views 3

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामाची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा 

समाजातील प्रत्येक वर्गाच्या सशक्तीकरणाकडं लक्ष केंद्रित केल्याबद्दल महायुती सरकारच्या प्रयत्नांची भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. त्यांनी काल मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी दूरस्थ पद्धतीनं ...

November 16, 2024 8:40 PM November 16, 2024 8:40 PM

views 8

टी-20 क्रिकेटमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिकेवर १३५ धावानी विजय

टी-20 क्रिकेटमध्ये चार सामन्यांच्या मालिकेतल्या काल झालेल्या, चौथ्या आणि अंतिम सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेचा १३५ धावांच्या मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह भारतानं चार सामन्यांची टी-20 मालिका ३-१ अशी जिंकली आहे. २८४ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १८ षटक २ चेंडूत १४८ धावांवर आटोप...

November 16, 2024 8:34 PM November 16, 2024 8:34 PM

views 36

पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत मुद्देमाल जप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकानं विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैध रोकड, सोनं, चांदी आणि दारू यासारखा मुद्देमाल जप्त केला आहे.   मुंबईतल्या वाशी चेकनाक्यावर आज एका ट्रकमधून सुमारे साडे आठ हजार  किलो चांदी जप्त केली. या चांदीचं  बाजारमूल्य अंदाजे ८...

November 16, 2024 8:14 PM November 16, 2024 8:14 PM

views 15

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला वेग

झारखंड विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानासाठीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. रालोआ अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशक आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या आज झारखंडमधे प्रचारसभा झाल्या. झारखंडमधलं हेमंत सोरेन सरकार आदिवासींना व्होटबँक समजून वागवत आहे, ...

November 16, 2024 8:02 PM November 16, 2024 8:02 PM

views 9

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांचा शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज दुपारी पक्षाच्या कार्यकारिणीकडे राजीनामा दिला. पक्ष प्रवक्ता दलजीत सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. नव्या अध्यक्षांच्या निवडीचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

November 16, 2024 7:56 PM November 16, 2024 7:56 PM

views 12

छत्तीसगढमधे सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगढमधे नारायणपूर जिल्ह्यातल्या अबुझमाड इथे आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले. यात २ महिलांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले आहेत. याशिवाय चकमकीच्या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या चकमकीत २ सुरक्षा जवानही जखमी...