December 3, 2024 7:17 PM

views 29

अदानी उद्योग समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण आणि इतर मुद्यांवरून निदर्शनं करत संसदेत विरोधी पक्ष सदस्यांचा सभात्याग

अदानी उद्योग समूहाचं कथित लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार आणि इतर मुद्यांवरून निदर्शनं करत लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी  आज सभात्याग केला. सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या मुद्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. मात्र हे मुद्दे शून्य प्रहरात उपस्थित करावेत, असं लो...

December 3, 2024 10:25 AM

views 3

देशातील थेट परदेशी गुंतवणुकीत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत चांगली वाढ

यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत देशातील थेट परदेशी गुंतवणुकीत अर्थात एफडीआयमध्ये जोरदार वाढ झाली असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढून 29 बिलियन डॉलर्सच्या वर गेली आहे. यावर्षी आलेल्या एफडीआयचा प्रामुख्यानं सेवा, संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, दूरसंचार, वाहन, औषधनिर्मिती आणि रसा...

December 3, 2024 10:20 AM

views 16

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज भारतीय संघाची मलेशिया बरोबर लढत होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. या आधी रविवारी झालेल्या सामन्यानं भारतानं दक्षिण कोरियाचा 8 विरुद्ध 1 गोलाने पराभूत करून अ गटात अव्वल स्थान मिळवलं ...

December 3, 2024 9:31 AM

views 35

ईव्हीएमबाबत खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरोधात निवडणूक आयोग दाखल करणार गुन्हे

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे खोटे दावे करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोक्कलिंगम यांनी दिला आहे. तसंच मतदानाच्या दिवशी संध्याकाळी वाढलेल्या मतदानाच्या आकडेवारी...

December 3, 2024 3:37 PM

views 26

भाजपाकडून विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षकांची नेमणूक

राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा सुरू आहेत. राज्यात भाजप विधिमंडळ गटनेता निवडीसाठी पक्षानं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या विधिमंड...

December 3, 2024 9:18 AM

views 19

रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात दीडपटीने वाढ

राज्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे गतवर्षीपेक्षा रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रात सुमारे दीडपटीने वाढ झाली आहे. ज्वारी, गहू, मकाच्या पेरणी क्षेत्राच्या वाढीबरोबरच यंदा तेलबियांच्या पेरणीचं क्षेत्र वाढलं आहे. त्यामुळे या रब्बी हंगामात, आधीच्या सरासरी 54 लाख हेक्टर क्षेत्रावरून या वर्षी सरासरी 60 ...

December 3, 2024 9:15 AM

views 18

फेंजल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता

फेंजल वादळाचा प्रभाव आणि परिणाम राज्यातही दिसून येत आहे. परभणी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, परभणी आणि आसपासच्या काही भागात काल जोरदार पाऊस पडला. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हरभरा, कापूस आणि तूर पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ हवामानामुळे तापमानात काह...

December 3, 2024 9:04 AM

views 24

98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार

आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागताध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वीकारलं आहे, अशी माहिती, सरहद संस्थेचे संजय नहार, मसापचे मिलिंद जोशी आणि संयोजन समितीचे डॉ. सतिश देसाई यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. पुढच्या वर्षी 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन दिल्ली...

December 3, 2024 8:59 AM

views 23

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रीय दिव्यांग सक्षमीकरण पुरस्कारांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिनानिमित्त दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना यावर्षीचे राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात एकंदर 33 व्यक्ती आणि संस्थांना हे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ...

December 3, 2024 8:24 AM

views 19

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज राज्याच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या शतकमहोत्सवी समारंभाला ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते शतकमहोत्सवी स्तंभाचं उद्घाटन होईल. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हेद...