December 5, 2024 3:30 PM

views 23

शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी देशातल्या कृषिशास्त्रज्ञांनी नवीन योजना विकसित कराव्या – राष्ट्रपती

नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल तसंच नैसर्गिक स्रोतांचा गैरवापर या समस्यांपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी देशातल्या कृषिशास्त्रज्ञांनी नवीन योजना विकसित कराव्या, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज भुवनेश्वर इथे ओडिशा विद्यापीठाच्या ४० व्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. सुपीक जमी...

December 5, 2024 3:20 PM

views 33

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज मंत्रिमंडळाचा विस्तार केला. रांची इथं राजभवनात झालेल्या समारंभात झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. झारखंड मुक्ती मोर्चाचे ६, काँग्रेसचे चार तर राष्ट्रीय जनता दलाचा एक असे हे मंत्रिमंडळातले ११ मंत्री आहेत.

December 5, 2024 2:58 PM

views 24

पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला नमवून भारतीय संघाने पटकावलं विजेतेपद

ओमान येथे झालेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानचा ५ - ३ असा पराभव केला. या संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे. पुरुष हॉकी कनिष्ठ आशिया क...

December 5, 2024 2:39 PM

views 19

झारखंड मध्ये विस्तारीत मंत्रीमंडळाच्या सदस्यांचा आज रांचीत शपथविधी

झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालच्या इंडिया आघाडीच्या सरकारच्या विस्तारित मंत्रिमंडळाच्या सदस्यांचा शपथविधी आज रांची इथं होणार आहे. राज्यपाल संतोषकुमार गंगवार अकरा मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे चार, काँग्रेसचे चार, तर राष्ट्रीय जनता दलाच्या एका मंत्...

December 5, 2024 2:35 PM

views 20

भारतीय रिझर्व्ह बँकेचं वित्त धोरण उद्या होणार जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त धोरण समितीची बैठक काल मुंबईत झाली. उद्या बँकेचं वित्त धोरण जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर स्थिर राखला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाइटची मर्यादा ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये केली ...

December 5, 2024 2:31 PM

views 11

फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित

सिंगापूर इथं सुरु असलेल्या २०२४, फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्यांच्यातील अनिर्णित राहिलेली ही सलग पाचवी फेरी आहे. त्यांनी आतापर्यंत एक एक गेम जिंकला असून त्यांचे ६ अनिर्णित राह...

December 5, 2024 2:23 PM

views 23

प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर केली चर्चा

प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होत असलेल्या महाकुंभ मेळ्यासंबंधित विविध कार्यक्रमांबाबत काल प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रयागराज इथल्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. या बैठकीत आकाशवाणीचे संचालक प्रज्ञा पालीवाल, दूरदर्शनचे महासंचालक कंचन प्...

December 5, 2024 2:17 PM

views 35

बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांची बांगलादेशातील अंतरीम सरकारवर टीका

बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायावर सुरु असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांनी बांगलादेशातील अंतरीम सरकारवर टीका केली आहे. न्यूयॉर्क मधल्या एका क्रार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीनं दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटल आहे की, मुहम्मद युनूस अल्पसंख्याकांच्या आणि हिंदूंच्या...

December 5, 2024 2:14 PM

views 15

भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि महाराणी पेमा वांगचुक यांच आज दोन दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन

भूतान नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि महाराणी पेमा वांगचुक यांच आज दोन दिवसाच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन झालं. परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी त्याचं विमानतळावर स्वागत केलं. या दौऱ्यात भूतान नरेंश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून परराट्रमंत्री आणि इतर वरिष्ठ सरक...

December 5, 2024 2:09 PM

views 24

अमेरिकेतील आरोग्य वीमा कंपनी युनायटेड हेल्थकेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉमसन यांची हत्या

अमेरिकेतली सर्वात मोठी आरोग्य वीमा कंपनी युनायटेड हेल्थकेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रायन थॉमसन यांची काल न्युयॉर्कमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. एका चेहरा झाकलेल्या व्यक्तींन त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. थॉमसन यांची कट रचून हत्या करण्यात आल्याचं स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. सुमारे...