December 10, 2024 7:38 PM

views 6

भारतात २०१७-१८ ते २२-२३ या कालावधीत श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचं एका अहवालात नमूद

भारतात २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. ग्रामीण भागातला श्रमशक्ती सहभाग दर २४ पूर्णांक ६ दशांश टक्क्यावरून वाढून ४१ पूर्णांक ५ दशांश टक्के इतका झाला आहे. तर शहरी भागातला श्रमशक्ती सहभाग दर २० पूर्णांक ४ दशांश टक्क्यावरून वाढून २५ पूर्णांक...

December 10, 2024 7:28 PM

views 14

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. बांगलादेश सरकारने अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत आणि हिंदू धर्मगुरूंची सुटका करावी, असा आग्रह भारत सरकारने करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकमध्ये विविध...

December 10, 2024 7:24 PM

views 17

देशातल्या एसआयपीमधला गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या महिन्यात २५ हजार कोटी रुपयांच्यावर

देशातल्या एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधला गुंतवणुकीचा ओघ सलग दुसऱ्या महिन्यात २५ हजार कोटी रुपयांच्यावर पोहोचला आहे. असोसिएशन फॉर म्युच्युअल फंड्स इन इंडियाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण गुंतवणूक ऑक्टोबर महिन्यात ६८ लाख कोटी ...

December 10, 2024 7:22 PM

views 39

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची तैवानच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

चीनने गेल्या तीस वर्षांत आसपासच्या किनारी प्रदेशात घुसखोरी केल्याची माहिती तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. चीनच्या किनारी भागातल्या समुद्रात गेल्या २४ तासांत ४७ विमानं आणि १२ युद्धनौका आढळून आल्या आहेत. यातल्या काही युद्धनौका ओकिनावा, तैवान आणि फिलिपीन्सना जोडणाऱ्या समुद्री भागात तैनात आहेत....

December 10, 2024 7:18 PM

views 18

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमान मुख्यालयाने आयोजित विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमान मुख्यालयाने आयोजित केलेली विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन आज अहिल्यानगर जिल्ह्यात पोहोचली. हिवरेबाजार इथून सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून पुढे मार्गस्थ करण्यात आलं. हिवरेबाजार ते अहिल्यानगर किल्ल्यापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर नागरिक या मॅरेथॉ...

December 10, 2024 7:07 PM

views 33

वर्ष २०२५ पासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा फक्त संगणक आधारित चाचणी स्वरूपात

वर्ष २०२५ पासून  सामायिक  विद्यापीठ प्रवेश परीक्षा , फक्त   सी बी टी अर्थात संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येईल , अशी माहिती  विद्यापीठ  आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार यांनी आज बातमीदारांना दिली. विदयार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेसाठी निवडलेले   विषयच  या परीक्षेत घेण्याचं बंधन असणार नाही. या प...

December 10, 2024 7:04 PM

views 24

फिलीपिन्समधे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे सुमारे ८७ हजार लोकांचं स्थलांतर

फिलीपिन्समधल्या  नेग्रोस बेटावरच्या  माउंट कानलाओन या ज्वालामुखीचा  उद्रेक झाल्या असून या भागातून  सुमारे ८७ हजार  लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.  या उद्रेकात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, संभाव्य उद्रेकांचा  धोका असल्यानं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्वालामुखीची राख विस्तृत क्षेत्रावर पड...

December 10, 2024 7:00 PM

views 12

वंचित बहुजन आघाडीच्या अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना अटक

वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा  जाधव यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन आरोपींना रत्नागिरी पोलिसांनी बदलापूरमधून अटक केली असून  गुहागरच्या न्यायालयानं  त्यांना १२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिव...

December 10, 2024 6:54 PM

views 14

स्वाहिद दिवसाच्या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली

आसाम चळवळीत स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या आणि अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या हुतात्म्यांना आज स्वाहिद दिवसाच्या निमित्तानं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. त्यांचा  दृढ निश्चय  आणि निःस्वार्थ प्रयत्नांमुळे आसामच्या  संस्कृतीची ओळख जतन करण्यात मदत झाली असून त्यांचे शौर्य प्रत्येक...

December 10, 2024 3:24 PM

views 32

विधानसभा निवडणुकीच्या वेळी व्हिव्हीपॅट चिठ्ठ्यांच्या पडताळणीबाबत सर्व प्रक्रियेचं पालन – निवडणूक आयोग

प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजणं आवश्यक आहे. यानुसार २३ नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी प्रत्येक मदारसंघातल्या प्रत्येकी पाच मतदान केंद्रावरच्या VVPAT चिठ्ठ्या मोजण्यात आल्या होत्या, असं निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत...