डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 16, 2024 1:51 PM | Donald Trump

printer

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इथल्या गोल्फ कोर्सवर एका संशयित बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे.

 

ट्रम्प यांनी, आपण सुरक्षित असून अध्यक्षपदाच्या आगामी निवडणुकीत शर्यतीत त्याच जोमानं पुढे जाणार असल्याची ग्वाही आपल्या समर्थकांना एका इमेलद्वारे दिली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी ट्रम्प सुरक्षित असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. दोनच महिन्यांपूर्वी पेन्सिल्वेनिया इथं ट्रम्प यांच्यावर एका बंदूकधाऱ्याने हल्ला केला होता, त्यात त्यांच्या कानाला दुखापत झाली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.