महायुती आणि मविआचं जागावाटप येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होणार

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी च्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. महायुतीमध्ये केवळ ३०-३५ जागांवर सहमती व्हायची आहे. एक-दोन दिवसात हे जागा वाटप जाहीर होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. नवी दिल्लीत ते आज वार्ताहरांशी बोलत होते. भाजपाच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली. अंतिम झालेल्या जागांवरचे उमेदवार महायुतीतले पक्ष लवकरच जाहीर करतील, असंही ते म्हणाले. 

राज्यातल्या २८८ जागांपैकी भाजपाला दीडशे, शिवसेना ८७ ते ९० आणि राष्ट्रवादी काँग्रेस ५० जागांवर लढण्यासाठी इच्छुक आहे असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.