डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महायुतीची बुथस्तरावरील समन्वयासाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीने बुथस्तरावरील समन्वयासाठी राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांसाठी विधानसभा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत या समन्वयकांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

 

विधानसभा निवडणुकांचं जागावाटप आणि उमेदवारीबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आले आहेत, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. महायुती सरकारने मोफत सिलेंडर योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज, विविध सिंचन योजना, महिलांसाठी मोफत उच्चशिक्षण, मोफत एसटी प्रवास, दोन वर्षात सुमारे पावणे पाच लाख कोटींची परकीय गुंतवणूक अशा विकास कामांच्या जोरावर महायुती जनतेसमोर जाणार आहे, असं ते म्हणाले.

 

महायुती बहुमताच्याही पुढचा आकडा गाठेल असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.