आषाढी एकादशीची तयारी राज्यभरात सुरु

आगामी आषाढी एकादशीची तयारी राज्यभरात सुरु झाली आहे. वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीला जाण्याचे वेध लागले आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जूनला सुरू होईल आणि त्याच दिवशी पालखी देहूतून प्रस्थान करेल. तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान १९ जून रोजी होईल. दरवर्षी देशभरातून लाखो वारकरी पंढरपुरात येतात. या वारकऱ्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनानं केलं आहे.