डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज 3 पदकं  जिंकली

शांघायमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज तीन पदकं  जिंकली.

पुरुष कंपाउंड स्पर्धेत  अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि ऋषभ यादव यांच्या संघानं अंतिम सामन्यात मेक्सिकोच्या  संघाला  पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं. 

महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम, मधुरा धामणगावकर आणि चिकिथा तानिपर्थी यांच्या संघानं अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकलं.  मेक्सिकोच्या संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला.

भारतानं  मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकलं.