आंध्रप्रदेशात मुसळधार पाऊस

मुसळधार पावसानं आज आंध्रप्रदेशातल्या एन टी आर, कृष्णा, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि कोणासीमा या तटवर्ती जिल्ह्यांना  झोडपून का़ढलं आहे. विजयवाडा, एलूरू आणि राजामुंड्री या जिल्ह्यांत सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसाचा परिणाम पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यांतल्या आंबा पिकांवर झाला  आहे. दरम्यान, एन टी आर आणि एलूरू जिल्ह्यातले जिल्हाधिकारी  स्थितीवर लक्ष ठेवून असून उन्मळून पडलेले वृक्ष बाजूला करण्याबरोबरच पूर आलेल्या भागात  मदत करत आहेत.