मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाकडून राज्यपालांना निवेदन सादर

बीड जिल्ह्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतली. तपास पूर्ण होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, वाल्मिक कराड यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदवावा, तसंच तपास पथकात निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी शिष्टमंडळानं यावेळी राज्यपालांकडे केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, आमदार संदीप क्षीरसागर, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.