डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागपूरात काही संस्थांचं भूमिपूजन आणि उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथं आज संध्याकाळी त्यांचं आगमन होईल. उद्या कामठी इथं काही संस्थांचं भूमिपूजन आणि उद्घाटन शहा यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते नांदेडला रवाना होतील. २७ मे रोजी मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.  

 

दक्षिण मुंबईतल्या माधवबाग लक्ष्मीनारायण मंदिराच्या १५० व्या जयंती महोत्सवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  उपस्थित राहणार आहेत. मंदिराला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल येत्या २७ मे रोजी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.