राज्यात महायुतीचं सरकार येईल – गृहमंत्री अमित शाह

राज्यातली जनता ही महायुतीच्या सोबत असून या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज धुळे इथे व्यक्त केला. शिंदखेडा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसुध्दा कमळाच्या आणि महायुतीच्या सोबत आहेत असं सांगतानाच शाह यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.