पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. लखनऊ इथे पोलीस कॉन्स्टेबल नियुक्तीपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. एकेकाळी ११ राज्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता फक्त तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे, असंही शहा यावेळी म्हणाले. देशातल्या पोलीस दलाचं आधुनिकीकरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालं. उत्तर प्रदेशात त्याची सुरुवात २०१७मध्ये झाल्याचंही शहा यावेळी म्हणाले.
Site Admin | June 15, 2025 6:09 PM | Home Minister Amit Shah
पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल-गृहमंत्री अमित शहा
