डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्याच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आज रात्री आठ वाजता त्यांचं पुण्यात आगमन होईल. रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते भाग घेतील.

 

त्यापूर्वी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी   पाचाड इथं राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचं ते दर्शन घेतील. केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा आणि छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक येण्याची शक्यता असल्यानं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतून नियंत्रित करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. 

 

त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा ते कशेडी दरम्यान  उद्या  अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी पहाटे एक वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. या बंदीतून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना वगळले आहे.