डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार – मंत्री अदिती तटकरे

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ३१ जुलै नंतर आलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू असून पात्र महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. अर्जांची प्रक्रिया जिल्हास्तरावर सुरू असून प्रशासकीय मान्यतेनंतर पात्र महिलांची माहिती विभागाकडं येते. त्यानंतर ही यादी बँकेकडे पाठवली जाते असं त्या म्हणाल्या.

 

आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी २ कोटी ६ लाख १४ हजार ९९० अर्ज प्राप्त झाले. यापैकी १ कोटी ४७ लाख ४२ हजार ४७६ अर्ज पात्र ठरले. तर ४२ हजार ८२३ अर्जाची पडताळणी सुरू आहे. ‘ राज्यात योजनेला  उत्तम प्रतिसाद मिळत असून बँक खात्याला आधारकार्ड क्रमांक लिंक करून घेत जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन तटकरे यांनी केलं आहे.