डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 13, 2024 6:35 PM | Home Minister Amit Shah

printer

उद्यापासून नवी दिल्लीत चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला आरंभ

चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला उद्यापासून आरंभ होत असून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित या हीरक महोत्सवी विशेष सोहळ्याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एक विशेष टपाल तिकिट आणि नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राजभाषा विभागांतर्गत भारतीय भाषा विभागाचं उद्घाटन तसंच अनेक पुस्तकं आणि मासिकांचं  प्रकाशन करण्यात येणार आहे.

 

केंद्रीय गृहमंत्र्यांचा राजभाषा दिनानिमित्तचा विशेष संदेश उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित  करण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळी दररोज पुणे केंद्रावरुन प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या सकाळी पावणेसात ते सहा वाजून ५५ मिनिटं या वेळेत प्रसारित होईल.