एअर इंडिया आणि इंडिगोच्या काही विमानसेवा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द

प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी जम्मू, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट इथली विमान उड्डाण सेवा आज रद्द केल्या आहेत. दिल्ली विमानतळावरून नियमित उड्डाणं होत आहेत. मात्र, बदलत्या हवाई परिस्थितीमुळे आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागाने अनिवार्य केलेल्या वाढीव सुरक्षा उपायांमुळे, काही उड्डाण वेळापत्रकांवर परिणाम होऊ शकतो, असं या विमान कंपन्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वेळापत्रकांवरच्या परिणामामुळे चेक-इन प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता असून संबंधित विमान कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपल्या उड्डाणाची वेळ तपासण्याचं आवाहन विमान कंपन्यांनी केलं आहे.