केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. अहमदाबादच्या थलतेज परिसरातल्या ८६१ घरांचं त्यांनी उद्घाटन केलं. दक्षिण बोपलमध्ये इलेक्ट्रोथर्म कंपनीनं अहमदाबाद महानगरपालिकेच्या सहकार्यानं विकसीत केलेल्या इलेक्ट्रोथर्म बागेचं, शाह यांनी उद्घाटन केलं. याशिवाय, सरखेज आणि वस्त्रपूर इथं तलाव, मेमनगर इथं पार्टी भूखंड आणि नवा वडाज इथल्या साडेतीनशे घरांचं उद्घाटन केलं. न्यू रणीप इथली व्यायामशाळा आणि वाचनालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी गोता इथल्या क्रीडा संकुलाचंही त्यांनी भूमिपूजन केलं.
अहमदाबाद महानगरपालिकेत नव्यानं नियुक्त झालेल्या सुमारे १०० सहायक अग्निशामक जवानांना त्यांनी नियुक्तिपत्रं प्रदान केली. याशिवाय, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या जीवनावर आधारित ‘चुनौतियां मुझे पसंद हैं’ या पुस्तकाच्या गुजराती आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत.