आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत- कृषीमंत्री

भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी विद्यार्थी संमेलनात बोलत होते. आपण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून  त्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांशी बोलून ही पदं तात्काळ भरण्याबाबत सूचवणार असल्याचंही ते म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार या क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देणं आवश्यक असून शेतकरी आणि कृषी क्षेत्रात देशात क्रांती आणण्याची क्षमता असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संमेलनात देशभरातले शेतकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रत्यक्ष तर हजारो विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीने सहभागी झाले होते. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.