डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेती उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं-कृषी मंत्री

कृषीवापरासाठीच्या उपकरणांशी संबधित वस्तू आणि सेवा करामधल्या सुधारणांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराज चौहान यांनी म्हटलं आहे.   यामुळे  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठा फरक पडेल, असं ते म्हणाले. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांवरचा कर १२ ते १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या सुधारणेचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याबाबत नवी दिल्ली इथं चौहान यांनी एक बैठक घेतली.