नवी दिल्लीत कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि इस्रायलचे कृषीमंत्री अवी डिचर यांनी आज नवी दिल्लीत कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. आगामी काळात अन्न सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या रणनीतीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. वाढतं तापमान आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करणारे, अधिक उत्पादन सुनिश्चित करणारे बियाणे विकसित करण्यावर भर देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी शेती अधिक फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.