डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शाश्वत आणि किफायतशीर शेतीसाठी सरकार वचनबद्ध-शिवराजसिंग चौहान

शाश्वत आणि किफायतशीर शेती, लवचिक पर्यावरण आणि  सर्वांसाठी अन्नसुरक्षा  उपक्रम  राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी  केलं.  नवी दिल्ली इथं आज  जागतिक मृदा परिषदेमध्ये बोलत असताना चौहान यांनी  मृदेच्या खालावलेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली. ही एक  जागतिक  समस्या असून रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे सुमारे ३० टक्के मृदा निकृष्ट बनली आहे आणि म्हणूनच सरकार सेंद्रिय शेतीला, शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाला  प्रोत्साहन देत आहे  असंही ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.