डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांची तत्काळ युद्धबंदीवर सहमती

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी काल ही घोषणा केली. कतारची राजधानी दोहा इथं, कतार आणि तुर्किएच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान हा करार करण्यात आला. या वाटाघाटींदरम्यान तत्काळ युद्धबंदी आणि दोन्ही देशांदरम्यान कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी पाठपुरावा बैठका घेण्यावर सहमती दर्शवण्यात आली असल्याचं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहेत. पाकिस्तानी शिष्टमंडळात संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ आणि गुप्तचर प्रमुख जनरल असीम मलिक यांचा समावेश होता तर अफगाणिस्तानचे प्रतिनिधित्व संरक्षण मंत्री मोहम्मद याकूब यांनी केले.