डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी सुमारे आठ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड वर्ग

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची मोकळी जागा वर्ग करण्यात आली आहे. धाराशिवच्या तहसीलदारांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे या ८ हेक्टर ३० गुंठे जागेचा ताबा सोपवल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. या जागेवर महाविद्यालयाची सुसज्ज इमारत उभारण्यासाठी संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून उत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात आली आहे. त्याकरिता ५१३ कोटी रूपयांचा सुधारीत प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे दाखल करण्यात आला असल्याचंही आमदार पाटील यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.