डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

दूरसंचार क्षेत्रात भारतानं साधलेली प्रगती आत्मनिर्भर भारताचं प्रतीक-प्रधानमंत्री

दूरसंचार क्षेत्रात भारतानं जी प्रगती साधली आहे, ती आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत यशोभूमी इथं आजपासून सुरू झालेल्या आशियातल्या सर्वात मोठ्या दूरसंचार मीडिया आणि तंत्रज्ञानविषयक ९ व्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ चं उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावर्षीच्या कार्यक्रमाची इनव्हेंट टू ट्रान्सफॉर्म ही मध्यवर्ती संकल्पना आहे.  

 

देशात काही वर्षांपूर्वी  टु जी नेटवर्क मिळण्यात अडचणी येत होत्या. परंतु आता बहुतांश भागांत फाईव्ह जी नेटवर्क मिळत आहे. डिजिटल कनेक्टिव्हटी ही प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. इंडिया मोबाइल काँग्रेस हे केवळ मोबाईल आणि टेलिकॉमपुरतं मर्यादित राहिलं नसून आशियातील सर्वात मोठा डिजिटल तंत्रज्ञान मंच म्हणून विकसित झाल्याचं ते म्हणाले.  

 

डिजीटल क्षेत्रात भारत जगातील इतर देशांच्या तुलनेत आघाडीवर असल्याचं केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं. २०१४ मध्ये ६ कोटी  इंटरनेट वापरकर्ते होते. आज ही संख्या  ९४ कोटींहून अधिक झाली आहे. देशातील ९९ टक्के जिल्हे फाईव्ह जी नेटवर्कनं  जोडले गेले असून जगातील २० टक्के मोबाइल वापरकर्ते भारतात असल्याचंही शिंदे यांनी नमूद केलं.