मुंबईच्या ओशिवरा भागात इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत ३ जणांचा मृत्यू

मुंबईच्या ओशिवरा भागात आज एका इमारतीतल्या घराला लागलेल्या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका वृद्ध दांपत्याचा आणि त्यांच्या मदतनीसाचा समावेश आहे. ओशिवरा इथल्या रिया पॅलेस या इमारतीत दहाव्या मजल्यावर सकाळी साडे आठच्या सुमाराला आग लागली. या आगीच्या धुरामुळे चंद्रप्रकाश सोनी, ममता सोनी आणि त्यांचा मदतनीस पेलू बेटा यांचा गुदमरून मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली असून या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.