डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

29 व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषदेचं दिल्लीत उद्घाटन

प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल यांच्या हस्ते नवी दिल्लीत २९व्या आंतरराष्ट्रीय प्रसारण आणि माध्यम तंत्रज्ञान परिषद- BES EXPO २०२५चं उद्घाटन करण्यात आलं. गेल्या दहा वर्षात देशातल्या डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये अनेक पटींनी वाढ झाली असल्याचं सेहगल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी बोलताना म्हणाले की, लोक आता अशा टप्प्यावर पोहोचले आहेत, जिथे आशयाचं केवळ जागतिकीकरणच नव्हे तर अत्याधिक वैयक्तिकीकरण आणि अत्याधिक स्थानिकीकरण करणंही शक्य आहे. एआय द्वारे माध्यम क्षेत्राच्या परिदृष्यात परिवर्तन : निर्मिती, सहकार्य आणि आर्थिक उत्पन्न असा या वर्षीच्या परिषदेचा मुख्य विषय आहे.